Pune Crime | पोलीस मित्र असल्याचे सांगून बलात्काराच्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी, तरुणाला लुबाडणाऱ्या चौघांना विश्रामबाग पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन बलात्काराच्या (Rape) खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी (Threat) देत एका तरुणाला लुबाडण्याचा प्रकार (Pune Crime) समोर आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) चौघांना अटक (Arrest) केली आहे.

 

ईरफान ईस्माईल सय्यद Irfan Ismail Sayed (वय 30, रा. गंगा व्हिलेज, सय्यदनगर, हडपसर), शंकर औदुंबर पकाले Shankar Audumbar Pakale (वय 27, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर), शरद रावसाहेब अहिरे Sharad Raosaheb Ahire (वय 24, रा. बाणेर, म्हाळुंगे), सुमित दादा सितापे Sumit Dada Sitape (वय 19, रा. डी पी रोड, मनपा शाळेसमोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) राहणार्‍या एका 24 वर्षाच्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना केळकर रोडवरील (Kelkar Road) मुरलीधर हॉटेल ते शनिवार पेठेतील वर्तकबाग दरम्यान 28 जुलै रोजी सायंकाळी सव्वा सात ते आठ वाजेच्या दरम्यान घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा दूध विक्री व्यवसाय (Dairy Business) करतो. तो 28 जुलै रोजी सायंकाळी नागनाथ पार चौकातून दुध घेऊन दुचाकीवर केळकर रोडवरील मुरलीधर हॉटेलसमोर आला. तेथे तो आईचा फोन आल्याने गाडी बाजूला लावून बोलत होता. त्यावेळी चौघे जण त्याच्याजवळ आले. त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. आम्ही पोलीस मित्र (Police Friend) आहोत, आम्हाला पैसे देत नाही तर तुला खोट्या बलात्काराच्या केसमध्ये (Rape Case) अडकवितो, असे सांगून पैशांची मागणी केली.

त्यानंतर त्याला पोलीस चौकीत घेऊन जातो, असे म्हणून त्याला मारहाण (Beating) केली. तो आरडाओरडा करुन लागला.
तेव्हा जाणारे येणारे लोक थांबल्यावर त्यांनी आम्ही पोलीस आहोत. हा आमचा घरगुती मॅटर आहे, तुम्ही निघुन जा, असे बोलले.
त्यामुळे कोणी त्यांना मदत करायला पुढे आले नाही. त्यानंतर त्यांना ते वर्तक बाग येथे घेऊन गेले.
तेथे त्यांनी एका मुलाचा व्हिडिओ दाखवला व यालासुद्धा खोट्या रेप केसमध्ये अडकवले आहे.
तो आता जेलमध्ये आहे. तु आता पैसे दिले नाही तर तुला सुद्धा खोट्या रेप केसमध्ये जेलमध्ये पाठवतो,
असे म्हणून त्याला पुन्हा मारहाण करुन त्यांच्या खिशातील 5 हजार 500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
त्यानंतर ते निघून गेले.

 

मारहाणीत त्यांचा डावा डोळा लाल झाल्याने त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन औषध घेतले.
त्यानंतर आता त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन आपल्याला लुटल्याची माहिती दिली.
फिर्यादी यांनी आरोपींच्या मोटारसायकलचा क्रमांक लक्षात ठेवला होता. त्यावरून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेच्या फुटेज तपासले.
तेव्हा त्यातही हे चोरटे कैद झाले होते. त्यावरुन पोलिसांनी चौघांचा पत्ता शोधून त्यांना अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे (PSI Rakesh Sarde) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Moneylender arrested for threatening 20 percent interest per month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aslam Sheikh | फडणवीसांच्या भेटीनंतर स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम?

 

Pune Crime | आतेभावाला शाळेतून आणण्यासाठी वाट पहात असलेल्या युवकावर टोळक्याकडून तलवारीने वार

 

Punit Balan Group | ‘खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणार’ – पुनीत बालन