Pune Crime | आतेभावाला शाळेतून आणण्यासाठी वाट पहात असलेल्या युवकावर टोळक्याकडून तलवारीने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आते भावाला शाळेतून आणण्यासाठी वाट पहात थांबलेल्या युवकाला एका टोळक्याने तलवार (Sword), दगडाने मारहाण (Beating) करुन जबर जखमी केले. याबाबत राजवीर दौलतसिंग टाक Rajveer Daulat Singh Tak (वय 18, रा. जय तुळजाभवनाी वसाहत, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ( Pune Crime) शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता हडपसर येथील बंटर शाळेतील मैदानात (Bunter school Ground) घडला.

 

हडपसर पोलिसांनी पोट्या (वय 19), गोट्या पांढरे (वय 30), प्रेम सुतार (वय 22), आकाश काकडे (वय 25), इतर चार अनोळखी अशा 9 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.( Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टाक हा दहावीमध्ये शिकत आहे.
तो त्याचा आतेभाऊ गणेश याला आणण्यासाठी बंटर शाळेतील मैदानात गेला होता.
तेथे तो वाट पहात असताना त्याच्या वसाहतीत राहणारे आरोपी तरुण तेथे आले.
त्यांनी फिर्यादी याला कानाखाली मारुन अश्लील भाषेत शिवीगाळ करुन गाडीत बस असे एक जण बोलला.
त्यावर फिर्यादी याने त्यास भाऊ माझी काय चुकी झाली भाऊ असे विचारुन तो पळून जाऊ लागला.
तेव्हा पोट्या याने डोक्यात दगड मारला. एकाने त्यांच्या पाठीवर तलवारीने वार करुन जखमी केले.
इतरांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा रस्त्याने जाणारी एक महिला त्यांना सोडविण्यास मध्ये आली.
त्यानंतर सर्व जण पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक गांधले (PSI Gandhle) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A youth who was waiting to fetch his brother from school was attacked by a gang with a sword

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aslam Sheikh | फडणवीसांच्या भेटीनंतर स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम?

 

Punit Balan Group | ‘खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणार’ – पुनीत बालन

 

Benefits Of Black Jamun | हिमोग्लोबिनच्या कमतरतेपासून ब्लड प्रेशरपर्यंत इफेक्टिव्ह आहे जांभूळ, जाणून घ्या अनेक फायदे