Pune Crime | गोधडी शिवण्यावरून सासु-सुनेत झाला वाद, फ्री स्टाईल हाणमारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सासू-सुनेत कोणत्या कारणावरून वादावादी होतील, याचा काही नेम नाही. अशीच एक घटना लोणी काळभोर (Loni Kalbhor Police Station) परिसरातील नायगाव पेठमध्ये घडली आहे. सासूच्या साडीच्या गोधड्या शिवल्या रागातून दोघींमध्ये वादावादी झाली. त्यानंतर सासूने इतरांना बोलावून घेत सुनेला बेदम मारहाण (Beating) केली आहे. ही घटना (Pune Crime) 19 ऑक्टोबरला घडली आहे.

 

प्रियंका असे जखमी झालेल्या सुनेचे नाव आहे. याप्रकरणी सासू सिंधू जगताप, शांता साबळे, दीर अक्षय साबळे, मामे सासरा संभाजी वायकर, मामेदीर विशाल वायकर, करिश्मा चौधरी, चुलतदीर शिवलाल जगताप, चुलत सासरा शशिकांत जगताप यांच्याविरूद्ध लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

प्रियंका नायगावमध्ये राहण्यास असून 19 ऑक्टोबरला त्यांची सासु सिंधू यांच्यासोबत वादावादी झाली होती.
साडीच्या गोधड्या शिवल्याच्या रागातून त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे सासून इतर नातेवाईकांना बोलावून प्रियंकाला बेदम मारहाण केली.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे (API Pratibha Tandale) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Mother-in-law and mother-in-law had an argument over sewing Godhdi, a free style brawl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | मदत करायची नसेल तर करू नका; पण शेतकर्‍यांची टिंगल तरी करू नका, एकनाथ खडसेंनी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना सुनावले

Gold-Silver Rate Today | दिवाळी सणात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra Politics | शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट! शिंदे गटातील 22 नाराज आमदार भाजपात विलीन होणार