Pune Crime | मंचरमध्ये कडप्प्याने मारहाण करुन खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मंचरमधील रोडवर (Manchar Road) लाकडी काठी व दगडी कडप्प्याने मारहाण करुन एकाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळु राधु पारधी (वय ५०, रा. वाळुंजवाडीची ठाकरवाडी, वडगाव काशिंबेग, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे खून (Murder) झालेल्याचे नाव (Pune Crime) आहे.

 

याप्रकरणी त्यांचा मुलगा संदेश बाळु पारधी (वय २२) यांनी मंचर पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ५७६/२१) फिर्याद दिली आहे. ही घटना मंचर गावातील मंचर ते घोडेगाव रोडलगत बिस्मिला दर्ग्याजवळ असणारे कब्रस्तानचे गेटच्या आत शुक्रवारी सकाळी ९ पूर्वी घडली आहे.

 

बाळु पारधी हे मंचर येथे गुरुवारी सायंकाळी आले होते. त्यानंतर त्यांचा पत्ता लागत नव्हता.
अज्ञात आरोपींनी काही कारणावरुन लाकडी काठी आणि दगडी कडप्प्याने मारहाण करुन त्यांचा खून केला
आणि त्यांचा मृतदेह कब्रस्तानाच्या गेटजवळ टाकून पळून (Pune Crime) गेले.
खूनामागील कारण अद्याप समजले नसून सहायक पोलीस निरीक्षक थाटे तपास करीत आहेत.

 

Web Title :-  murder in manchar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

केवळ 8 हजार देऊन घरी घेऊन जा 86 kmpl मायलेजची TVS Star City Plus, केवळ इतका द्यावा लागेल EMI

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील 36 वर्षीय विवाहित महिला डॉक्टरसोबत तरुणाचं विकृत कृत्य; नग्न होण्यास भाग पाडलं, अन्…

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 2 दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, IMD चा इशारा