Pune Crime | साईड न दिल्याने तरुणाचा खून; मुळशी तालुक्यातील उरवडे लवासा रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | रविवारी मुळशी (Mulshi) तालुक्यात फिरायला जात असलेल्या तरुणाने मोटारसायकलला जाण्यास साईड न दिल्याने चिडून तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याचा खून (Murder In Pune) केला. (Pune Crime)

सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३८, रा. तुंगी ता़ मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना उरवडे ते लवासा रोडवर आंदगावातील तक्षशिलानगर येथे जाणार्‍या रस्त्यावर रविवार दुपारी दीड वाजता घडली. (Pune Crime)

याप्रकरणी राजेश अंकुश कुंवर (वय ३१, रा. भुशी, रामनगर, लोणावळा) यांनी पौड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७३/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोन मोटारसायकलवरील तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ सुभाष वाघमारे मोटारसायकलवरुन जात होते. यावेळी एकाला फिर्यादीच्ने साईड न दिल्याच्या कारणावरुन त्यांच्या वाद सुरु झाला. त्याने फिर्यादी यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेऊन त्यांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण केला. त्याने व दुसर्‍या मोटारसायकलवरुन आलेले दोघे अशा तिघांनी सुभाष वाघमारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव (PSI Shrikant Jadhav) तपास करीत आहेत.

Advt.

Web Title : Pune Crime | Murder of a young man for not giving a side;
Incident on Urvade Lavasa Road in Mulshi taluka of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा