Pune Crime | पुण्याच्या कर्वेनगर परिसरात भरदिवसा 20 वर्षीय युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्याच्या कर्वेनगर (Karve Nagar) परिसरात भरदिवसा एका 20 वर्षीय युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून (Murder in Pune) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. 26) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अलंकार पोलिस ठाण्याच्या (Alankar Police Station) हद्दीतील चितळे लेनजवळ रक्ताच्या थारोळयात तरूण पडला होता. त्यास तातडीने रूग्णालयाकडे रवाना करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल राजेंद्र जाधव (Anil Rajendra Jadhav) नावाच्या 20 वर्षीय तरूणाचा भरदिवसा तलवारीने सपासप वार करून खून झाला आहे. अनिलची बहिण कर्वेनगर परिसरातील फक्कड हॉटेलमध्ये (Fakkad Fodds Pune) स्वयंपाकाचे काम करते. तो तिला सोडण्यासाठी आला असताना ही घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. अनिल जाधव याच्यावर तिघांनी तलवारीने सपासप वार केले आहेत. काही क्षणातच तो रक्ताराच्या थारोळयात पडला. जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, याबाबत शहर नियंत्रण कक्षाशी (Pune City Control) संपर्क साधला असता त्यांनी काही वेळापुर्वीच खबर आली असल्याचे सांगितले.

फक्कड हॉटेलमध्ये अनिल जाधवची बहिण स्वयंपाकाचे काम करते.
तो तिला सोडण्यासाठी आला असता तिघांनी त्याच्या डोक्यावर आणि खांद्यावर तलवारीने सपासप वार केले. त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता पाटील (Police Inspector Sangeeta Patil), उपनिरीक्षक लहाने, उपनिरीक्षक सपताळे, कर्मचारी पवार, राठोड, गायकवाड, केकाण,
गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अलंकार पोलिस ठाण्याचे अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतले आहे.

 

परिसरातील CCTV फुटेजमध्ये काही कैद झाले आहे काय हे देखील पोलिस तपासत आहेत.
भरदिवसा पुण्यात 20 वर्षीय तरूणाचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
अनिल जाधवचा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

 

Web Title :- Pune Crime | Murder of anil rajendra jadhav in karve nagar of pune alankar police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोन्याच्या किमतीत घसरणीने खरेदीदारांच्या चेहर्‍यांवर समाधान, जाणून घ्या आठवडाभरातील सोने-चांदीची स्थिती

 

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला जाणाऱ्या बीडच्या शिवसैनिकाचा वाटेत मृत्यू

 

Pune Crime | ‘पुणे ग्रामीण’ची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरातून 50 लाखाचा गांजा जप्त; 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक

 

NPS Traders | राष्ट्रीय पेन्शन योजना देते छोट्या व्यापार्‍यांना वृद्धत्वात पेन्शनचा आधार, जाणून घ्या सरकारी योजनेचा कसा घ्यायचा लाभ

 

Pune Crime | क्लिप पाहून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या 5 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; पुण्यातील घटना