Pune Crime | हडपसरमध्ये पत्नीचा खून करुन मेव्हणीवर चाकूने केले वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दारुच्या नशेत पत्नीला पट्ट्याने मारहाण करीत असल्याची तक्रार आईला केल्याच्या कारणावरुन पत्नीवर चाकूने वार करुन तिचा पतीने खून (Murder In Pune) केला तिला सोडविण्यासाठी आलेल्या मेव्हणीवरही वार करुन तिच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा प्रकार हडपसरमधील (Hadapsar) साडेसतरानळी येथे घडला. (Pune Crime)

 

याप्रकरणी पोलिसांनी पती हनुमंत धोंडिबा पवार (वय २२, रा. सूर्यवंशी बिल्डिंग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी, हडपसर) अटक करण्यात आली आहे. नंदिनी हनुमंत पवार (वय १९) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर मेव्हणी कोमल वैजनाथ लांडगे (वय २२, रा. साडेसतरानळी, हडपसर) या जखमी झाल्या आहेत. (Pune Crime)

 

याप्रकरणी नंदिनीची आई माणिका शिवाजी कांबळे (वय ५५, रा. सूर्यवंशी बिल्डिंग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८१३/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदिंनी आणि हनुमंत यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. तिला सांभाळण्यासाठी नंदिनीसोबत तिची बहिणी रहात होती. हनुमंत हा बिगारी काम करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. तो पत्नीला वारंवार मारहाण करीत असे. मंगळवारी रात्री हनुमंत याने नंदिनीला पट्ट्याने मारहाण केली असता त्याबद्दल ती आपल्या आईला सांगत होती. त्यावेळी हनुमंत तेथे आला. त्याने तू तुझ्या आईला काय सांगत आहेस. तुला आता सोडत नाही, असे म्हणून दारुच्या नशेत त्याने त्याच्याकडील चाकूने नंदिनीच्या छातीवर, पोटावर वार केले. ते पाहून तिला वाचविण्यासाठी तिची बहीण कोमल धावत गेली. तेव्हा त्याने तिच्यावरही वार करुन तिला गंभीर जखमी केले. (Pune Crime)

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule) यांनी भेट दिली.
सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पउसळकर तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Murder Of Wife In Hadapsar Area Husband Arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा