Pune Crime | जुन्या वाड्यात पकडलं? वडीलांशी जिव्हाळ्याच्या मैत्रीचे ‘संबंध’ असल्याच्या रागातून बहिण-भावानं महिलेला केलं ‘खल्लास’

पुणे/ बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | वडीलांशी मैत्रीचे (friendship) संबंध असल्याच्या रागातून बहिण-भावाने एका महिलेला काठीने बेदम मारहाण (Beating) करुन खून (Murder) केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime ) बारामती (baramati) शहरात घडली आहे. याप्रकरणी बहिण-भावा विरोधात फॅमिली डॉक्टरने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार डॉ. सुनील पवार Dr. Sunil Pawar (रा. माळेगाव खुर्द) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश प्रमोद फडतरे व अनुजा प्रमोद फडतरे (रा. कसबा, बारामती) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

 

फिर्यादी यांचे बारामतीमध्ये हॉस्पिटल असून संशयितांचे वडील प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे हे मागील तीन वर्षापासून दारुचे व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्याकडे येत.
त्यामुळे त्यांचे फडतरे कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहेत. 10 नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास अनुजाने त्यांना फोन करुन सांगितले की,
वडीलांना एका महिलेसोबत जुन्या वाड्यात पकडले असून आम्ही दोघांनी तिला काठीने मारल्याचे सांगितले. (Pune Crime)

 

दुसऱ्या दिवशी अनुजाने फोन करुन सांगितले की, या महिलेचा श्वास चालत नाही, तिला ऋषिकेशने बारामती येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले.
तेथील डॉक्टरांनी तिला मयत (Death) घोषीत केले. आम्ही तिच्या नातेवाईकांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो.
तुम्ही तिचा मृत्यू हृदयविकाराने (Heart attack) झाल्याचे सांगा अशी विनंती केली.
यावर फिर्यादी यांनी असे सांगण्यास नकार दिला. आरोपी मयत महिलेचा मृतदेह घेऊन डॉक्टर पवार यांच्याकडे आले.
महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी त्यांनी शवविच्छेदन करुन घेण्याचा सल्ला त्यांनी (Pune Crime) दिला.

 

मयत महिलेच्या अंगावर कोणत्याही बाह्य प्रकारच्या जखमा नव्हत्या. केवळ नाकातून किरकोळ रक्त आले होते.
मृत महिला घसरून पडून अटॅक आल्याचे आरोपींनी सांगितले. प्रमोद फडतरे यांनाही मारहाण झाली होती.
मुलांनी खरी माहिती दिली नसल्याने त्यांनाही घातपाताची शंका आली नाही.
यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी सर्वांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, या घटनेत प्रमोद फडतरे यांनाही मार लागल्याने त्यांच्यावर डॉ. पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये 19 नोव्हेंबर पर्यंत उपचार सुरु होते.
त्यावेळी त्यांनीही मुलगा व मुलीने मारहाण केल्याचे सांगितले. सोमवारी (दि. 22) डॉ. पवार यांना महिलेच्या मृत्यूसंबंधी पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी घटनेचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी बहिण भावाकडे चौकशी केली असता त्यांनी मारहाण केल्याची कबुली दिली.
तसेच मृत महिलेचा मोबाईल आणि वडिलांचे रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
त्यांना मंगळवार (दि.23) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक (Police Inspector Sunil Mahadik) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | murder woman anger over her friendship father baramati city police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 929 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

DBSKKV Ratnagiri Recruitment 2021 | कृषी क्षेत्रातील उमेदवारांना नोकरीची संधी ! ‘या’ कृषि विद्यापीठात लवकरच भरती; पगार 35,000 रूपयांपर्यंत

DGP Sanjay Pandey | UPSC पॅनेलच्या शॉर्टलिस्टमध्ये ‘या’ तीन अधिकाऱ्यांची नावे, DGP संजय पाडे यांचे नावच नाही