Pune Crime News | जंगली महाराज रस्त्यावरून 3 मुले बपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील रस्त्यावर फुगे विक्री करणारी तीन लहान मुले बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार जंगली महाराज रोडवर (Jangli Maharaj Road) घडला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात अपहरणाचा (Kidnapping) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) गुरुवारी (दि.2) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला आहे.

जनाबाई शंकर काळे (वय-10), दत्तु शंकर काळे (वय-7), आरती शंकर काळे (वय-5) अशी बेपत्ता झालेल्या लहान मुलांची नावे आहे. याबाबत मुलांची आई आयना शंकर काळे (वय-35 रा. फुटपाथ, जंगली महाराज रोड, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) शुक्रवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 363 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन मुलांचा शोध सुरु केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना तीन मुले आहेत.
फुटपाथवर राहून फुगे विक्री करण्याचा व्यवसाय त्या करतात.
दोन दिवसांपूर्वी त्या मुलांवर ओरडल्याची प्राथमिक माहिती आहे. आई रागावल्याने मुले कुठेतरी निघून गेल्याची शक्यता आहे. पोलीस फिर्यादी यांच्या नातेवाईकांकडे मुलांबाबत चौकशी करत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव (PSI Sandeep Jadhav) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | 3 children rescued from Jungli Maharaj street; A case of kidnapping has been registered

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल

Kangana Ranaut | सिद्धार्थ-कियाराच्या विवाह सोहळ्यापूर्वी कंगना रणौतने त्यांच्यासाठी लिहिली ‘हि’ खास पोस्ट

Nawazuddin Siddiqui | अभिनेता नवाजुद्दीनच्या अडचणींमध्ये वाढ; पत्नीच्या आरोपांनंतर कोर्टाने बजावली नोटीस