Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : 3 कोटींची फसवणूक ! सायबर पोलिसांकडून क्रिप्टोबिझ कंपनीचा मालक राहुल राठोडसह (हिंजवडी) ओमकार सोनवणेला (कोंढवा) अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime News | नफ्याच्या अमिषाने क्रिप्टोबिझ एक्स्चेंजवर (CryptoBiz Exchange) स्टेकींग प्रोग्राममध्ये गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळण्याचे आमिष दाखवून 2 कोटी 93 लाख 66 हजार 842 रुपयांची फसवणूक करणार्‍या क्रिप्टोबिझ कंपनीच्या मालकाला (Owner Of CryptoBiz Arrested) पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

 

राहुल विजयभाई राठोड Rahul Vijaybhai Rathod (वय ३५, रा. ब्ल्यूरिच सोसायटी, हिंजवडी) असे त्याचे नाव आहे. त्याचा मुख्य साथीदार ओमकार दीपक सोनवणे
Omkar Deepak Sonwane (वय २५, रा. एलिना लिव्हिंग, कोंढवा) याला ही अटक करण्यात आली आहे. याबाबत रवि शंकर पाटील यांनी पुणे सायबर पोलिसांकडे फिर्यादी दिली होती. गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन २४ तासात अटक केली. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल राठोड याने आपल्या क्रिप्टोबिझ एक्स्चेंजवर स्टेकिंग प्रोग्राममध्ये गुंतवणुक (Investment In CryptoBiz Exchange) केल्यास मोठा परतावाना मिळेल, असे पाटील यांना आमिष दाखविले (Lure Of Money) . त्यानुसार पाटील यांनी गुंतवणुक केली. सुरुवातीला त्यांना नफा मिळत होता. परंतु, कालांतराने राठोड याने नफा दिला नाही. त्यांनी वारंवार आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याने त्यांनी पुणे सायबर पोलीस (Pune Polie) ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्याप्रमाणेच इतर 43 जणांची 2 कोटी 93 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

 

तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने पोलिसांनी दोघांचा ठावठिकाणी शोधून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक चारचाकी, लॅपटॉप, मोबाईल, पेन ड्राईव्हसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

ही कारवाई अर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे (Pune Police Crime Branch) पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मिनल सुपे पाटील (Sr PI Minal Supe Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (PI Chandrashekhar Sawant), पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले (PSI Tushar Bhosale), सचिन जाधव (PSI Sachin Jadhav), संदीप कदम (PSI Sandeep Kadam) , पोलीस अंमलदार संतोष जाधव, नवनाथ कोंडे, प्रविण राजपुत, बापु लोणकर यांच्यासह पथकाने केली.

 

Web Title :-  Pune Crime News | 3 crore fraud! Pune Cyber ​​police arrested Cryptobiz company owner
Rahul Rathod (Hinjawadi) along with Omkar Sonwane (Kondhwa)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

FIR On BJP Ex-Corporator Vivek Yadav | दोन गटातील वादातून लष्कर पोलिस ठाण्यात गोंधळ !
माजी नगरसेवक विवेक यादव याच्यासह 10 जणांविरूध्द गुन्हा

CM Eknath Shinde | राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

B.L. Verma On New Cooperative Policy In Pune | पुणे : केंद्र सरकार नवीन सहकार धोरण लवकरच जाहीर करणार
– केंद्रीय राज्यमंत्री बी.एल.वर्मा (Video)

Chandrakant Patil | मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील

Unseasonal Rains In Pune | अलर्ट ! आगामी 2 दिवस पावसाचे, पुणेकरांनी घ्यावी काळजी