Pune Crime News | उत्तमनगर परिसरातील वाईन्स शॉपवर सशस्त्र दरोडा घालणारे 5 जण ताब्यात

4 अल्पवयीन मुलांचा समावेश, गावठी पिस्तुलासह तलवारी आणि रोकड जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि अ‍ॅस्ट्रोलिया (IND Vs AUS CWC) यांच्यामध्ये सुरू असताना रविवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास उत्तमनगर परिसरातील (Uttam Nagar Police Station) शिवणे येथील आर.आर. वाईन्स शॉपवर (RR Wines Pune) सशस्त्र दरोडा (Dacoity In Pune) घालणार्‍या 5 जणांना उत्तमनगर आणि सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अवघ्या 24 तासात हा उघडकीस आणण्यात आला असून दरोडेखोरांकडील गावठी पिस्तुल, तलवारी आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. (Pune Crime News)

तजेस राहुल पिंपळगावकर (19, रा. पंचशिल अपार्टमेंट, प्लॅट नं. 43, मल्हार हॉटेलजवळ, सिंहगड रोड, माणिकबाग, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या इतर 4 अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना येरवडयातील बाल न्यायमंडळमध्ये हजर करण्यात आले आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अटक आरोपी आणि त्याच्या इतर साथीदारांनी आपआपसात संगणमत करून उत्तमनगर परिसरातील आर.आर. वाईन्स शॉपवर गावठी पिस्तुल, तलवारींचा धाक दाखवुन दरोडा टाकून तब्बल 3 लाख 90 हजार रूपये चोरून नेले होते.

उत्तमनगर आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मंगळवारी धायरी, माणिकबाग, सिंहगड रोड परिसरातून 5 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 32 हजार 800 रूपयांसह गावठी पिस्तुल, तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी तेजस पिंपळगावकर याला दि. 25 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त प्रविणकुमार पाटील,
पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहाय्यक पोलिस आयुक्त भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिस ठाण्याचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवाडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार,
एपीआय उमेश रोकडे, पोलिस अंमलदार समीर पवार, तुषार किंन्द्रे, ज्ञानेश्वर तोडकर,
दत्तात्रय मालुसरे आणि प्रमोद कुमदकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

स्वारगेट परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 61 वी स्थानबध्दतेची कारवाई

अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग, एकाला अटक; चिखली परिसरातील घटना

पुण्यातील कणसे अँड कंपनीची साडेबारा लाखांची फसवणूक, तिघांवर FIR