Pune Police MPDA Action | स्वारगेट परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 61 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार फैजल उर्फ गट्ट्या करीम शेख Faizal alias Gattya Karim Sheikh (वय-27 रा. इंदिरानगर, गुलटेकडी, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 61 वी कारवाई आहे.

फैजल शेख स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार (Criminals On Pune Police Records) आहे. त्याने साथीदारांसह स्वारगेट परिसरात तलवार, कोयता, चाकु या सारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दुखापत, खंडणी, दंगा बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 4 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीवाला व मालमत्तेला नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपी फैजल शेख याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे (Sr PI Sunil Zaware) यांनी पोलीस आयुक्त यांना पाठवला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी फैजल शेख याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. ही कमगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे (Sr PI A. T. khobare), पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली. (Pune Police MPDA Action)

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध
व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का,
तडीपार, एमपीडीए यासारख्या कारवाया केल्या आहेत.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून 10 महिन्यात दहशत निर्माण करणाऱ्या व
सक्रिय गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत 61 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील कणसे अँड कंपनीची साडेबारा लाखांची फसवणूक, तिघांवर FIR

हॉटेल कर्मचाऱ्यांकडून मालकाला लाखोंचा गंडा, मगरपट्टा परिसरातील प्रकार

धक्कादायक! गर्लफ्रेंडशी भांडण झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलनं संपवलं स्वत:चं आयुष्य