OLX कार विक्रीची जाहिरात देवून सायबर चोरटयांनी 37 हजारांना गंडविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   OLX वर कार विक्रीचे जाहिरात देऊन सायबर चोरट्यांनी 37 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी स्वप्नील साळवी (वय ४०,रा. गणेशनगर, धायरी) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात आयटी ऍक्ट व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांना कार खरेदी करायाची होती. यादरम्यान त्यांनी OLX वर कार विक्रीची जाहिरात काही दिवसांपूर्वी पाहिली होती. जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी साळवी यांना ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. साळवी यांनी बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने ३७ हजार ४०० रुपये भरले.

त्यानंतर साळवी यांनी अज्ञाताच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर साळवी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक नंदकिशोर शेळके तपास करत आहेत.