Pune : हडपसर-गाडीतळ उड्डाणपुलाखालून वर्षाच्या बाळाचं अपहरण करणार्‍या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   गाडीतळ उड्डानपुलाखालून एक वर्षाच्या बाळाचे अपहरण करून पसार झालेल्या व पुन्हा बाळाला उड्डाणपुला खाली आणून सोडणार्‍या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. मुल होत नल्याच्या कारणावरून दोन सख्या बहीणी व त्यांच्या दाजीने अपहणाचा केल्याचे समोर आले आहे.

पंचशीला तिपन्ना मेलीनकेरी (33), वैशाली तुळशीराम सोनकांबळे (41) आणि केरनाथ नागनाथ सुर्यवंशी (तिघेही रा. जय तुळजा भवानी हॉटेलच्या मागे, ता. दौंड, जि. पुणे मुळ रा. शिरपुर ता. बसवकल्याण जि. बिदर, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी पुलाखाली झोपलेल्या आईजवळून 1 वर्षाच्या मुलाचे दोन महिलांनी अपहरण केले होते. फिर्यादी या मूळच्या इंदापूर तालुक्यातील आहेत. त्यांना दोन मुले आहेत. एक तीन वर्षांचा आणि दुसरा एक वर्षाचा दरम्यान काल त्या पतीसोबत वाद झाल्याने येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मुलाचे अपहरण केले होते. आज पहाटे मुलाला पुन्हा पुलाखाली सोडल्यानंतर हडपसर पोलिसांचा तपास येथेच थांबला नाही. त्यांनी पहाटे मुलाला सोडून गेलेल्या आरोपींचा तांत्रिक माहितीच्या आधारे मागोवा काढला. त्यावेळी पळविणारे आरोपी चौफुला येथे असल्याचे समजले. चौफुला येथील चौका जवळून तिघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दरम्यान त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात पंचशीला आणि वैशाली ह्या सख्या बहिणी असून आरोपी केरनाथ हा त्यांचा दाजी आहे. महिला आरोपी पंचशीला हिला मुल होत नसल्याने तिघांनी हा अपहणाचा डाव रचल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, याप्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर अटक होण्याच्या भितीने तिघांनी पुन्हा बाळाला हडपसर येथील उड्डाणपुलाखाली सोडले.

ही कारवाई उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम व त्यांच्या पथकाने केली.