Pune Crime News | तरुणीला मारहाण करुन विनयभंग, पुण्यातील अरण्येश्वर रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तरुणील भररस्त्यात मारहाण (Beating) करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना रविवारी (दि.15) दुपारी सव्वा बारा ते साडेबारा या दरम्यान अरण्येश्वर रोडवर घडली आहे. याप्रकरणी दोघांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

अक्षय शिंदे (रा.टांगेवाला कॉलनी, पुणे) व त्याच्या साथीदारावर आयपीसी 354अ, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी येथे राहणाऱ्या 24 वर्षाच्या तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मैत्रिणीसोबत तुळशीबागेत एका दुकानासमोर बोलत थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने विनाकारण फिर्यादी यांना शिवीगाळ केली. यानंतर त्या मैत्रिणीच्या दुचाकीवरून जात असताना शिंदे याने त्यांचा पाठलाग केला. सहकारनगर येथील नवजीवन मित्र मंडळाच्या येथे फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करून पुन्हा शिवीगाळ करुन हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे (PSI Kale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘…तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार
ठाकरेंना राहिला नाही’, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल (व्हिडिओ)

Pune Crime News | अश्लील चाळे करुन महिलेचा भररस्त्यात विनयभंग, मगरपट्टा परिसरातील घटना; दोघांना अटक

Eknath Khadse On Udayanraje Bhosale | ‘शरद पवारांनी मार्गदर्शक व्हावं’,
उदयनराजे यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर,’उदयनराजेंनी आधी…’

Mumbai Pune Expressway | महत्वाची बातमी! पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज एक तासांचा ब्लॉक

Ajit Pawar On Meera Borwankars Allegations | मीरा बोरवणकरांचे आरोप अजित पवारांनी फेटाळले, म्हणाले-‘जमिनींचा लिलाव करण्याचा अधिकार…’

अश्लील बोलून महिलेचा विनयभंग, पतीला पोलीस चौकी बाहेर धमकी देणाऱ्या दोन भावांवर FIR; वाघोली परिसरातील घटना