
Pune Crime News | वेबसिरीजमध्ये काम देण्याच्या आमिषाने अभिनेत्रीची फसवणूक, पुण्यातील प्रकार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका अभिनेत्रेची सायबर गुन्हेगाराने ऑनलाइन फसवणूक (Online Cheating Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सिंहगड रस्ता (Sinhagad Raod) परिसरात राहणाऱ्या एका अभिनेत्रीने फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याने फिर्यादी यांना वेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले. हैदरबाद येथे एका वेबसिरीजचे चित्रीकरण सुरु असून त्या वेबसिरीजसाठी ऑडिशन द्यावी लागेल असे सांगितले. त्यासाठी पुणे ते हैदराबाद विमान तिकिटाचे पैसे ऑनलाइन जमा करण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी विश्वास ठेवून चोरट्याने सांगितल्या प्रमाणे 16 हजार 560 रुपये ऑनलाइन पाठवले. मात्र,
चोरट्याने अभिनेत्रीला विमानाचे तिकीट पाठवले नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अभिनेत्रिने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेत सायबर चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Sr PI Jayram Paygude) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rohit Pawar | शरद पवार व गौतम अदानी भेटीवर रोहित पवारांनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले…
विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू