Pune Crime News | पुणे : 3 तोळे सोन्याची लगड लाच म्हणून स्विकारल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाची 8 वर्षांनी निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | 3 तोळे सोन्याची लगड लाच म्हणून स्विकारल्याच्या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय यशवंत महाजन (API Vijay Yashwant Mahajan) यांची तब्बल 8 वर्षानंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश डी.व्ही. कश्यप (Special Judge D.V. Kashyap) यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. एपीआय महाजन यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रताप परदेशी (Adv Pratap Pardeshi) यांनी कामकाज पाहिले. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 27 फेब्रुवारी 2015 रोजी गुन्हे शाखा युनिट -4 चिंचवड पुणे कार्यालयात (Pune Police Crime Branch) 3 तोळे सोन्याची लगड लाच म्हणून स्विकारल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय यशवंत महाजन यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधन अधिनियम 1988 चे कलम 7, 11, 13 (1) (D) सह 13 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होऊन पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात (Pune Shivaji Nagar Court) दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. त्यांस विशेष न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी निर्दोष मुक्त केले आहे. (Pune Crime News)

तक्रारदार यांची व्हरायटी ज्वेलर्स या नावाने पिंपळे निलख (Variety Jewellers in Pimple Nilakh Pune) येथे दुकान असून आरोपी यांनी अटक केलेल्या गुन्हेगाराने त्यांना चोरीचे सोने विकल्याची कबूल केले असल्याने पहिले तक्रारदार यांचेकडून 12 तोळे सोने हस्तगत केले. आणखी 3 तोळे सोने हस्तगत करताना त्यांना अटक करण्यात आली. याकामी सरकारपक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीतर्फे ॲड. प्रताप परदेशी यांना कामकाज पाहिले. त्यांना ॲड. प्रमोद धुळे (Adv Pramod Dhule) व ॲड. महेश राजगुरू (Adv Mahesh Rajguru) यांनी मदत केली. आरोपीच्या वकिलांनी सदरील 03 तोळे सोने हे गुन्हयाच्या कामी हस्तगत करीत असताना तक्रारदारी यांनी कशाप्रकारे खोट्या गुन्हयात आरोपींना अडकविल्याचे सिद्ध केले, त्यांचा युक्तीवाद व बचाव ग्राहय धरून मे. कोर्टाने सबळ पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे

 

Advt.

Web Title :  Pune Crime News | Assistant Police Inspector Vijay Yashwant Mahajan acquitted after
8 years in the case of accepting 30 gm gold bars as bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा