Pune Crime News | रिक्षाचालकावर धारदार हत्याराने हल्ला, दोघांवर FIR; मांजरी येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | प्रवासी घेऊन जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी रिक्षाचालकासोबत (Rickshaw Driver) वाद घालून धारदार हत्याराने मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार मांजरी परिसरात घडला आहे. हा प्रकार गोपाळपट्टी चौकातील (Gopalpatti Chowk Manjri) एका क्लिनीक समोर शनिवारी (दि.2) रात्री पावणे आठच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) दोन सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत गणेश बळीराम गायकवाड (वय-33 रा. मांजरी रेल्वे गेट जवळ, मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन संकेत रमेश घुले व मयुर रमेश घुले (रा. मांजरी रेल्वे गेट जवळ, मांजरी बुद्रुक) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. शनिवारी रात्री प्रवासी घेऊन जात असताना
गोपाळपट्टी चौकात आरोपी विरुद्ध दिशेने दुचाकीवरुन आले. आरोपींनी फिर्यादी यांना माझ्याकडे काय बघतो अशी
विचारणा केली. त्यावेळी मला रिक्षा बाजूला घेताना इकडे तिकडे बघाव लागतं, असं गायकवाड यांनी आरोपींना सांगितले.
याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली. तसेच धारदार हत्याराने मारहाण करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस हवालदार करंजकर (Police Havildar Karanjkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार