Pune Crime News | रुणाच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न, रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांवर गुन्हा; भवानी पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाटील चौक काशेवाडी भवानी पेठ (Bhavani Peth Pune) येथे बुधवारी (दि.13) दुपारी दोनच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत मोईनुदिन आसीफ कुरेशी (वय-22 रा. भवानी पेठ, पुणे) याने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश उर्फ गण्या गायकवाड (काशेवाडी, भवानी पेठ) याच्यासह इतर दोघांवर आयपीसी 307, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल आहे. आरोपी गायकवाड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोईनुदिन कुरेशी हा भवानी पेठेत वेफर्सचा कन्टेनर खाली करुन माल गोडाऊनमध्ये ठेवत होता. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन ‘आज इसको दिखाते है गण्या क्या चिज है’ असे म्हणत धक्का देऊन ‘पथ्थर से इसका मर्डर करते है’ असे म्हणून रस्त्याच्या बाजूला पडलेला सिमेंटचा पेव्हर ब्लॉक फिर्यादीच्या डोक्यात दोन ते तीन वेळा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर गायकवाड याच्या इतर साथीदारांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament |
‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे १५ सप्टेंबर पासून आयोजन

खडकी परिसरात दहशत माजवणाऱ्या शाहरुख उर्फ सुलतान बागवान टोळीवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 61 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA