पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून (Lure of Marriage) गेल्या चार वर्षांपासून तो तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवत होता. लग्नाचा बहाणा करुन तिच्याकडून १ लाख रुपये घेतले. आता त्याने तिच्याशी लग्न न करता दुसरीशी साखरपुडा केला. त्याच्या घरच्यांनी शुभमचा नाद सोडून दे, प्रकरण नाही मिटवले तर धडा शिकवील, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथील एका २३ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४३/२३) दिली आहे. त्यानुसार, शुभम पायगुडे, रोहित पायगुडे, अनिल पायगुडे, संगीता पायगुडे, बाळासाहेब पायगुडे (सर्व रा. आगळंब, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे (Crime Against Woman). हा प्रकार जुलै २०१९ पासून सुरु होता. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम पायगुडे याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले. कात्रज येथील हॉटेल मराठे शाही (Hotel Marathe Shahi Katraj) येथे नेऊन त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. लग्न करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून १ लाख रुपये घेतले. शुभमचा भाऊ रोहित पायगुडे याने शुभम सोबत लग्न करायचे असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे फिर्यादीला सांगितले. त्याने शुभम व फिर्यादी यांच्या प्रेमसंबंधाबाबत (Love Affair) घरी सांगितले. तेव्हा त्याच्या आई वडिलांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. त्याचा दुसर्या मुलीबरोबर साखरपुडा केला. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेल्या होत्या. तेव्हा रोहित याने फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने मारहाण (Beating) केली. शुभमचा नाद सोडून देत, प्रकरण नाही मिटवले तर धडा शिकवील, अशी धमकी दिली. पोलीस (Pune Police) उपनिरीक्षक कथले तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police Station: Sexually assaulted a
young woman by luring her into marriage; engagement with another girl
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- PI Rajesh Khandve Arrested | वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना अटक, जाणून घ्या प्रकरण
- Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशन : टेम्पोचालकावर कोयत्याने वार करुन लुटले; बाजारात जात असताना वाटेत साडेपाच लाख रुपये लुबाडले
- MP Sanjay Raut | अजित पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांची दिलगरी, म्हणाले- ‘मला खेद वाटतो, मी असे…’