Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चेष्टामस्करी केल्याने झालेल्या वादातून खूनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करुन पळून गेलेल्या टोळक्यातील तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police News) जेरबंद केले आहे. (Pune Crime News)

 

आदित्य विशााल गोसावी Aditya Vishal Gosavi (वय २०, रा. धनकवडी), राज राकेश परदेशी Raj Rakesh Pardeshi (वय २३, रा. धनकवडी), ओमकार चंद्रकांत सावंत Omkar Chandrakant Sawant (वय १८, रा. मोहननगर, धनकवडी – Dhankawadi) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी पाच जणांवर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी आदित्य राजेंद्र बर्डे (वय २२, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३७३/२३) दिली आहे. हा प्रकार धनकवडीतील वेलनेस मेडिकलसमोर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे एका अल्पवयीन मुलासोबत चष्टामस्करीतून वाद झाला होता.
याचा राग होता. फिर्यादी हे इतर मित्राबरोबर चहा हाइट येथे चहा पित बसले असताना पाच जणांचे टोळके तेथे आले.
त्यांनी आदित्य व त्याचा भाऊ ऋषी बर्डे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
ऋषी याच्या डोक्यावर, हाता पायावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.
ऋषी बर्डे याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पोलिसांनी तिघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक घावटे (API Ghavte) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police Station – Youth fatally attacked with a coyote;
Attempted murder due to an argument over teasing

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा