Pune Crime News | बंडगार्डन पोलिसांकडून दरोडयाच्या गुन्हयातील आरोपीला अटक (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) दारोडयाच्या गुन्हयातील आरोपीला अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. दि. 11 मे 2023 रोजी आयबी चौकाजवळ आरोपीने युवकास मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची चेन जबरदस्तीने चोरून नेली होती.

शाहीद अब्दुल दाऊत (18, रा. ताडीवाला रोड, पुणे – Tadiwala Raod Pune) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मयुरेश संदिप चव्हाण (23, रा. न्यु मोदिखाना, कॅम्प, पुणे – Modikhana Camp Pune) हे दि. 11 मे 2023 रोजी रात्री 11.30 वाजता आयबी चौकात (IB Chowk Pune) मित्राबरोबर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपीने दुचाकीवरून येवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याची साखळी चोरून नेली होती. (Pune Crime News)

 

बंडगार्डन पोलिस स्टेशनमधील मार्शल पोलिस अंमलदार जाधव आणि बधे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली.
पोलिस उपनिरीक्षक संतोष वाघमारे (PSI Santosh Waghmare) आणि त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), सहाय्यक पोलिस आयुक्त आर.एन. राजे (ACP R. N. Raje),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील (Sr PI Santosh Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष वाघमारे,
पोलिस अंमलदार जाधव आणि बधे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

 

Web Title :- Pune Crime News | Bundagarden Police Arrested Robbery Accused (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | इराणी टोळीचा म्होरक्या नादर चंगेज इराणीसह 12 जणांविरूध्द ‘मोक्का’,
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 24 वी MCOCA कारवाई

Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही 2024
मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी – मोहन जोशी

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकामध्ये काँग्रेसची ‘लाट’ अन् भाजपाची ‘वाट’,
मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी मान्य केला पराभव (Video)

Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – पत्नी आणि सासरच्यांकडील लोकांच्या छळामुळे
तरुणाने केली आत्महत्या; पत्नीने बनावट कागदपत्राद्वारे घर, जागा बळकाविली