Pune Crime News | वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून साहित्य घेऊन हॉटेल विकून दोघांनी घातला ७३ लाखांना गंडा; दुध, दुधाचे पदार्थ, कोळसा, मासे, किराणा, भाजीपाला घेऊन फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हॉटेलसाठी वेगवेगळ्या व्यावसायिकाकडून उधारीवर त्यांनी साहित्य घेतले. त्यानंतर हॉटेल विकून ते फरार झाले असून व्यावसायिकांची ७३ लाख ६५ हजार ९४६ रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरण अवधेश उपाध्याय (वय ३९, रा. आनंदनगर, केशवनगर, मुंढवा) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शौकत अली खान, रेणुरतन शौकतअली खान (रा. पंचशिल टॉवर, खराडी) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार खराडी येथील स्काय हाय व फ्लास हाय हॉटेल येथे २०१६ ते ३० डिसेबर २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकत अली खान व त्याची पत्नी रेणुरतन खान
यांनी त्यांच्या हॉटेलसाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी दुध व दुधाचे पदार्थ घेतले.
त्यांचे एकूण ३९ लाख रुपये न देता फसवणूक (Fraud Case) केली.
तसेच सिमरजित जसबिरसिंह अरोरा यांच्याकडून कोळसा घेऊन त्यांची ६ लाख ८४ हजार ९३५ रुपयांची फसवणूक केली.
अश्विन परदेशी यांच्याकडून ६ लाख ८२ हजार ८०० रुपयांचे मासे घेतले.
विजय शिवले यांच्याकडून १९ लाख २३ हजार ८७२ रुपयांचा भाजीपाला घेतला.
श्रीकांत कापसे यांच्याकडून १ लाख ७४ हजार ११० रुपयांचा किराणा माल घेतला होता. हॉटेल असल्याने ते पैसे देतील,
असे वाटल्याने या व्यावसायिकांनी त्यांना उधार माल दिला होता. मात्र, त्यांनी ३० डिसेबर रोजी अचानक हॉटेल बंद केले.
त्यानंतर ते पसार झाल्याने शेवटी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | By taking materials from different businessmen and selling the hotel, the two made a sum of 73 lakhs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | देशात सरकार बदलण्याचा मूड, आगामी बदलांसाठी ‘ही’ गोष्ट अनुकूल; शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra Prison Department | आता विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले

PMPML | पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत प्रवास, 8 मार्च पासून बससेवा पुर्ववत