Pune Crime News | पुण्यात चक्क सामोशात सापडले कंडोम, गुटखा आणि खडे; एकाला अटक (Video)

पुणे : Pune Crime News | चिखली (Chikhali) येथील एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीच्या कँटीनमध्ये सामोशामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे सापडले. तर काही सामोशांमध्ये खडे सापडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी केटरिंग कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणात आता संबंधित संशयित व्यावसायिकाविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. हा सगळा प्रकार व्यावसायिक शत्रुत्वाचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

या प्रकरणात औंध परिसरात (Aundh) कार्यालय असणाऱ्या संबंधित केटरिंग सेवा पुरवठादार कंपनीच्या संचालकांनी केलेल्या तक्रारीनुसार चिखली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कँटीनसाठीचे कंत्राट एका केटरिंग कंपनीला दिले होते. या कंपनीने त्याचे उपकंत्राट एका स्थानिक व्यावसायिकाला दिले. पण काही दिवसांपूर्वी सामोशामध्ये एक वापरलेली बँडेज पट्टी सापडली. त्यानंतर या व्यावसायिकाचे उपकंत्राट रद्द करून ते दुसऱ्या एका व्यावसायिकाला देण्यात आले.

यानंतर आधीच्या व्यावसायिकाने मनात राग ठेवून आपल्या दोन व्यक्तींना नव्या व्यावसायिकाकडे काम करण्यासाठी पाठवले.
यातून त्याचा व्यवसाय बंद पाडण्यासाठी त्यांनी नव्या व्यावसायिकाच्या
कँटीनमधील सामोशामध्ये कंडोम, गुटखा, खडे या गोष्टी टाकल्या.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे.
तसेच आधीच्या व्यावसायिकाकडील ३ व्यक्ती आणि नव्याने उपकंत्राट दिलेल्या
व्यावसायिकाकडे पाठवलेल्या २ व्यक्ती अशा एकूण ५ व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित