Pune Crime News | विक्रीसाठी विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या परराज्यातील तरुणासह दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

0
397
Pune Crime News | Crime Branch arrested two persons, including a foreign youth, who were carrying unlicensed Gavathi katta for sale
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये विनापरवाना गावठी कट्टा (Gavathi Katta) विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील तरुणासह दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Cell) एक ने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गावठी कट्टा, मोबाईल असा एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई (Pune Crime News) नगर रोडवरील वाघोली येथे करण्यात आली.

 

शुभम शांताराम शिसवाल (वय-19 रा. गांधीनगर, मुगर रोड, खंडवा, मध्यप्रदेश), सनी संजय जेधे (वय-24 रा. ई वॉर्ड, लोणावळा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

पुणे-नगर रोडवरील वाघोली येथील सातव हायस्कूल बस स्टॉप (Satav High School Bus Stop) समोर दोनजण गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रविण उत्तेकर, संदीप शिर्के यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता 20 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी आरोपींकडून गावठी कट्टा, दोन मोबाईल असा एकूण 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad),
सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle), शैलजा जानकर (API Shailaja Jankar),
पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, मारुती पारधी, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, योगेश मोहिते,
विशाल दळवी, विशाल शिंदे, पांडुरंग पवार, राहुल जोशी, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जादव, रेहाना शेक यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Crime Branch arrested two persons, including a foreign youth, who were carrying unlicensed Gavathi katta for sale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब जिवंत असते तर संजय राऊतांना…,’ शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची संतप्त टीका

Amol Mitkari | राज्यपालांचा राजीनामा म्हणजे, उशीरा सुचलेले शहाणपण; अमोल मिटकरींची खोचक टीका