Pune Crime News | सहकारी गृहसंस्थेच्या जमिनीची परस्पर विक्री करून सव्वा दोन कोटींची फसवणूक, 8 जणांवर FIR; विश्रांतवाडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सहकारी गृहरचना संस्थेची (Co-operative Housing Society)140 गुंठे जमिनीची परस्पर विक्री करुन संस्थेची 2 कोटी 25 लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जमीन खरेदी करणाऱ्यासह संस्थेच्या 7 जणांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकार 2018 मध्ये घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत प्रमोद सिताराम बेंगस्ट्रा (वय-61 रा. भवानी पेठ, पालखी चौक, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर भागवत शेलार, विवेक परदेशी, राजकुमार शिलेदार, श्रीकांत फुलपगार, नंदकुमार नागवडे, तानाजी कुंभार, तानाजी कटक, लक्ष्मण जगदाडे यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शिवसागर सहकारी गृहरचना संस्था मर्या. (Shivsagar Cooperative Housing Society) यामध्ये आरोपी हे प्रवर्तक आहेत. आरोपींनी संगणमत करुन संस्थेची 140 गुंठा जमीन ही कोणत्याही सभासदांना विश्वासात न घेता तसेच पूर्व सूचना न देता, ठराव पास न करता 2018 मध्ये लक्ष्मण जगदाडे याला विक्री केली. आरोपींनी जमिनीची विक्री करताना रद्द न होणारे कुल मुखत्यारपत्र तयार करुन जमीनेचे खरेदी खत करुन दिले.

आरोपींनी या व्यवहारातून आलेली 2 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम संस्थेच्या बँक खात्यात जमा न करता स्वत: खात्यात जमा करुन संस्थेची फसवणूक (Fraud Case) केली. याबाबत फिर्यादी यांनी तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament |
‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे १५ सप्टेंबर पासून आयोजन

Pune Liquor Shops Closed for Three days | गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पुणे शहर व जिल्हयात
3 दिवस मद्यविक्री बंद