Pune Crime News | 2 कोटींच्या iPhones चोरीचा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडून उघडकीस, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वेअर हाऊसचा सिमेंटचा पत्रा तोडून चोरट्यांनी तब्बल 266 आयफोन चोरुन (Stealing iPhone) नेल्याची घटना घडली होती. ही घटना (Pune Crime News) लोणीकंद-केसनंद रोडवरील वेअर हाऊस मध्ये 17 जुलै रोजी घडली होती. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका आरोपीला अटक (Arrest) केली आहे. (Apple Phone)

इस्माईल फजल शेख Ismail Fazal Shaikh (वय-35 रा. मध्य पियारपुर, तहसिल उधवा, ठाणा राधानगर, जि. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात (Pune Crime News) आलेल्या आरोपीचे नाव आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोधत घेण्यात आला. त्यावेळी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या काही टोळ्या झारखंडमधील (Jharkhand) साहेबगंज जिल्ह्यात (Sahibganj District) सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक राधानगर पोलीस स्टेशन (Radhanagar Police Station) साहेबगंज झारखंड येथे पाठवण्यात आले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन आरोपी निष्पन्न केले. मात्र आरोपी पश्चिम बंगालमध्ये पळून गेले होते.

दरम्यान 19 ऑगस्ट रोजी लोणीकंद पोलीस ठाण्यातील पथक पुन्हा साहेबगंज येथे पाठवण्यात आले. या पथकाने आरोपी इस्माईल शेख याला ताब्यात घेतले. त्याचा ट्राझिस्ट रिमांड घेऊन गुरुवारी (दि.24) लोणीकंद पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने चार साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल टोळीचा म्होरक्याने पश्चिम बंगाल मधील एजंट मार्फत विकल्याची माहिती दिली. उर्वरित आरोपींचा व चोरीचा माल घेणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. लवकरच त्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांना अटक केली जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहयक पोलीस आयुक्त येरवडा विभाग (Yerwada Division) संजय पाटील (ACP Sanjay Patil), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे (Senior PI Vishvajeet Kaingade) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे (API Ravindra Godse), गजानन जाधव (API Gajanan Jadhav), पोलीस अंमलदार स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, अजित फरांदे, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Low Cost Fruit And Vegetables Benefits | सर्व प्रकारच्या रोगांचे शत्रू आहेत ‘ही’
5 स्वस्त कलरफुल फळे आणि भाज्या, आराग्यात ताजेपणा येण्यासाठी रोज खा

Why Do Women Have More Sleep Problems | महिलांना सर्वात जास्त का होते झोपेची समस्या?
जाणून घ्या 3 मोठी कारणे, ‘स्‍लीप डिसऑर्डर’ची ही लक्षणे

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना