Pune Crime News | अल्पवयीन मुलीला धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, तरुणावर FIR; विश्रांतवाडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीला वेळोवेळी रस्त्यामध्ये अडवून तिला धमकी देऊन शारीरिक संबंधाची (Physical Relationship) मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Minor Girl Molestation Case) . हा प्रकार धानोरी परिसरात घडला आहे. याप्रकरणी 26 वर्षाच्या तरुणावर विनयभंगासह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित 13 वर्षाच्या मुलीच्या आईने (वय-37) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.13) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शुभम राम पवार Shubham Ram Pawar (वय-26 रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) याच्यावर आयपीसी 354, 354(ड), 504, 506, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 पासून सुरु होता. (Pune Crime News) (Pune Crime News )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मुलीला वेळोवेळी रस्त्यात अडवून तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकी देऊन गैरवर्तन केले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament |
‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे १५ सप्टेंबर पासून आयोजन

खडकी परिसरात दहशत माजवणाऱ्या शाहरुख उर्फ सुलतान बागवान टोळीवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 61 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA