Pune Police News | दरोड्याच्या तयारीतील 9 आरोपी गजाआड, CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांच्याकडून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | जंगली महाराज रोडवरील (JM Road Pune) पेट्रोल पंपावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या 9 जणांच्या टोळीला डेक्कन आणि शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना शिताफीने अटक केली. ही कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार (Pune Police News) यांना पोलीस आयुक्तालयात बोलवून पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी त्यांचा सन्मान केला.

 

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे (Shivaji Nagar Police Station) सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे (API Bholenath Ahiwale) यांना माहिती मिळाली की, नदीपात्रालगत असलेल्या गोठ्याजवळ 8-9 मुले हातात धारदार शस्त्रे घेऊन काहीतरी योजना आखत आहेत. अहिवळे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात मोकळे मैदान असल्याने आरोपी पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे अहिवळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यातील रात्र गस्तीवर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक मिरा कवटीकवार (PSI Mira Kavtikwar) यांची मदत मागितली. डेक्कन आणि शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचला. पोलीस आल्याचे समजताच आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा काही अंतर पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. (Pune Police News)

 

गौतम उर्फ लखन अंबादास बनसोडे Gautam alias Lakhan Ambadas Bansode (वय-29 रा. पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर), राम विलास लोखंडे Ram Vilas Lokhande (वय-23 रा. नवी पेठ, पुणे), सुनिल बाबासाहेब कांबळे Sunil Babasaheb Kamble (वय-20 रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), अश्रु खंडु गवळी Ashru Khandu Gavli (वय-19 रा. दांडेकर पुल), रोहित चांदा कांबळे Rohit Chanda Kamble (वय-19), रोहन किरण गायकवाड Rohan Kiran Gaikwad (वय-19 पाटील इस्टेट, शिवाजीनगर), किरण सिताप्पा खेत्री Kiran Sitappa Khetri (वय-20 रा. कात्रज), ओंकार बाळु ननावरे Omkar Balu Nanavare (वय-21 रा. राजेंद्रनगर,पुणे), शाम विलास लोखंडे Sham Vilas Lokhande (वय-20 रा. नवी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींवर डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station)
आयपीसी 399, 402 नुसार गुन्हा (Pune Crime News) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लोखंडी कोयता,
चाकू तसेच दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी ही कारवाई मंगळवारी (दि.4) संभाजी उद्यानाच्या मागील मुठा नदीपात्रात केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill),
सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर (ACP Vasant Kuwar),
डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस (Sr PI Vipin Hasbanis), पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर साळुंखे (PI Shankar Salunkhe), शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Sr PI Arvind Mane), पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (PI Vikram Gaud) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर वाघोले, रामकृष्ण काकड, श्रीकृष्ण सांगवे, विकास सराफ आणि डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अशोक इनामदार, गणेश तरंगे, शेखर कौटकर, निलेश सोनवणे, नागनाथ बागुले, जगदीश तळोले, मिलींद कदम यांनी केली.

 

Web Title : Pune Police News | 9 accused in preparation for robbery are arrested, CP Ritesh Kumar, Jt CP Sandeep Karnik felicitation of police officers and staff

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांचे श्रमदान, चाँदसैली घाटाने घेतला मोकळा श्वास

Maharashtra Municipal Elections | विरोधकांची ताकद दुभागल्याने ऑक्टोबरमध्ये महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता

Pune PMC News | समाविष्ट 34 गावांतील विकासकामांचा अहवाल तयार करण्याच्या समितीमध्ये 12 जणांना संधी मिळणार