Pune : दुसऱ्यासोबत फिरत असल्याने तिघांकडून तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  दुसऱ्यासोबत फिरत असल्याने तिघांनी तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना डेक्कन परिसरात घडली. काल सायंकाळी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अमित भाट (वय 34, वारजे), अतुल शेलार (वय 35, रा. कोथरुड) व विजय कानगुडे (वय 36, खिलरेवाडी) यांना अटक केली आहे. याबाबत साजिद शेख (वय 36) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवार पेठेत राहण्यास आहेत. दरम्यान ते मित्र योगेश तापकीर यांच्यासोबत फिरत असत. याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्यादी हे काल सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास पायी चालत घरी जात होते. त्यावेळी संजीवनी हॉस्पिटलमध्ये जवळ आल्यानंतर तिघांनी अडवले. तसेच योगेश तापकीर यांच्यासोबत का फिरतो असे म्हणून वाद घालत शिवीगाळ केली. तसेच बेदम मारहाण करून पसार झाले. फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी शोध घेऊन तिघांना अटक केली. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.