Pune Crime News | भरधाव डंपरने एकाला चिरडले, कोंढवा परिसरातील घटना; डंपर चालकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी डंपर चालकाला कोंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही घटना (Pune Accident News) मंगळवारी (दि.5) दुपारी साडेतीनच्या सुमारास टिळेकर नगर येथील महालक्ष्मी वॉशिंग सेंटरच्या बाजूच्या रोडच्या कडेला घडली. (Pune Crime News)

भारत गोपाळ चंदेवाड Bharat Gopal Chandewad (वय-50 रा. संभाजीनगर, कोंढवा-सासवड रोड, कोंढवा बुद्रुक) याच्यावर आयपीसी 354अ, 338, 279 सह मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) कलम 119/177, 184 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र पांडुरंग खामकर यांनी बुधवारी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. मयत आरोपीची अद्याप ओळख पटलेली नाही. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदेवाड हा डंपर चालक आहे. मंगळवारी डंपर घेऊन टिळेकरनगरच्या रस्त्याने भरधाव वेगात जात होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी वॉशिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 35 ते 40 वयोगटातील एका व्यक्तीला त्याने चाकाखाली चिरडले. या अपघातात या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुदळे (API Kudle) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Ajit Pawar Group | अधिवेशनापूर्वीच वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचे कार्यालय अध्यक्षांनी दिले अजित पवार गटाला

कामगारांचा पीएफ न जमा केल्याप्रकरणी हॉटेलच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल; बालेवाडीतील प्रकार

‘तू म्हाताऱ्या माणसावर दादागिरी का करतो’, तरुणावर कोयत्याने वार; पिंपरीतील घटना

बीआरटी मार्गातून जाताना पीएमटीला धडकून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी

PSI- Cop Dismissed In Pune | पुण्यात महिला पोलिस अधिकार्‍यासह दोघे सेवेतून बडतर्फ, जाणून घ्या प्रकरण

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक