Pune Pimpri Chinchwad Crime News | बीआरटी मार्गातून जाताना पीएमटीला धडकून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील बीआरटी मार्गातून (Pune BRT) दुचाकी चालवणे एका अल्पवयनी मुलीच्या जीवावर बेतले आहे. भरधाव वेगातील दुचाकी पीएमटी बसला (PMT Bus) समोरुन धडकून झालेल्या अपघात (Pune Accident News) मुलीचा मृत्यू (Death) झाला तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात येरवड्यातील डेक्कन कॉलेज (Deccan College) बसस्थानकासमोरील बीआरटी मार्गात रविवारी (दि.3) दुपारी पावणे तीनच्या सुमारास झाला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ऋतुजा अमित कदम Rituja Amit Kadam (वय-17 रा. परांडे नगर, दिघी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्यावर आयपसी 304अ, 279, 337, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार सागर अशोक जगताप (वय-35) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. या अपघातात मयत ऋतुजा हिचा मित्र प्रतीक मोहोड Pratik Mohod (वय-24) हा गंभीर जखमी झाला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. रविवारी ऋतुजा आणि प्रतिक दुचाकीवरुन बीआरटी मार्गातून भरधाव वेगात जात होते. ऋतुजा दुचाकी चालवत होती. त्यावेळी समोरुन येणाऱ्या पीएमटी बसला दुचाकीची धडक बसली. त्यामुळे दोघेही खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. ऋतुजाला तात्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या अपघातात प्रतिक मोहोड जखमी झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम (API Amar Kadam) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Ajit Pawar Group | अधिवेशनापूर्वीच वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचे कार्यालय अध्यक्षांनी दिले अजित पवार गटाला

Pune Crime News | उद्धट वर्तनाबाबत कर्मचाऱ्याला नोटीस, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीकडून सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण

MLA Disqualification Hearing | आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरला होणार का? राहुल नार्वेकर म्हणाले…

12 BJP MP Resign | भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेत दिल्लीत महत्वाची बैठक, लोकसभेच्या हालचाली वाढल्या

Pune ACB – FIR On Tukaram Supe | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी व तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपेवर पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Avneet Kaur Glamorous Photos | लंडनमध्ये एंजॉय करताना अवनीत कौरने शेअर केले क्यूट फोटो, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लागली आग…

ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल