Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तू म्हाताऱ्या माणसावर दादागिरी का करतो’, तरुणावर कोयत्याने वार; पिंपरीतील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तू म्हाताऱ्या माणसावर दादागिरी का करतो, असे म्हणत तीन ते चार जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन दारुच्या बाटलीने मारहाण (Beating) केली. तसेच तरुणाच्या सासू व पत्नीला धक्काबुक्की केली. हा प्रकार पिंपरी (PCPC Police) येथील भाटनगर येथे सोमवारी (दि.4) रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

आकाश शम्मी सिंह (वय-31 रा. पिंपरी, मुळ रा. दिल्ली) यांनी मंगळवारी (दि.5) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन आकाश भुंगा कांबळे (वय-25 रा. निराधार नगर, पिंपरी), संतोष पवार, पवन मेवाते, राज (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 307, 452, 427, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे एका म्हाताऱ्या व्यक्तीने जेवणासाठी पैसे मागितले. तू रोज मला का पैसे मागतो, असे म्हणत फिर्यादी रागावले. तू म्हाताऱ्या माणसावर दादागिरी करतो का, असे म्हणत आकाश कांबळे याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. मी कोण आहे ते तुला माहिती नाही, असे म्हणत इतरांना बोलावून घेतले व फिर्यादी यांच्या घरात घुसले.

आरोपींनी फिर्यादीची सासू, पत्नीला धक्काबुक्की केली. याला आज जिवंत सोडायचे नाही, असे म्हणत त्यांनी
कोयत्याने फिर्यादी सिंह यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच कोयता दरवाजा व खिडकीवर
मारुन नुकसान केले. जर का पोलिसांत तक्रार केली तर तुम्हा सर्वांना जीवे ठार मारु, अशी धमकी (Death Threats) दिली.
यानंतर आरोपींनी हातातील कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.
तसेच आरोपी राज याने बीयरची बाटली फिर्यादी यांच्या पाठित मारली. तर संतोष पवार आणि पवन मेवाते
यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Ajit Pawar Group | अधिवेशनापूर्वीच वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचे कार्यालय अध्यक्षांनी दिले अजित पवार गटाला

Pune Crime News | उद्धट वर्तनाबाबत कर्मचाऱ्याला नोटीस, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीकडून सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण

MLA Disqualification Hearing | आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरला होणार का? राहुल नार्वेकर म्हणाले…

12 BJP MP Resign | भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेत दिल्लीत महत्वाची बैठक, लोकसभेच्या हालचाली वाढल्या

Pune ACB – FIR On Tukaram Supe | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी व तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपेवर पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Avneet Kaur Glamorous Photos | लंडनमध्ये एंजॉय करताना अवनीत कौरने शेअर केले क्यूट फोटो, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लागली आग…

ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल