Pune Crime News | म्हाडात आमचे सेटिंग आहे, सांगत चक्क केली नोटरी; म्हाडात स्वस्तात फ्लॅट देण्याचा करार करुन केली फसवणुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | म्हाडात (MHADA) आमची सेटिंग आहे, तुम्हाला स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी चक्क करार करुन तो नोटरीकडे नोंदवून फसवणूक (Cheating Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत लोहगाव येथे राहणार्‍या एका ४१ वर्षाच्या तरणाने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९७१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उमाकांत रामदास ढाके (Umakant Ramdas Dhake) आणि शुभम उमाकांत ढाके Shubham Umakant Dhake (रा. रियल इस्टेट, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे कोल्हापूरचे राहणारे असून चिंचवड एम आय डी सी
मध्ये (Chinchwad M.I.D.C) इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीतील एकाने त्यांना उमाकांत ढाके
व शुभम ढाके म्हाडाचे फ्लॅट मिळवून देतात, असे सांगितले. फिर्यादी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांची भेट घेतली.
त्यावेळी त्यांनी आमची म्हाडामध्ये सेटिंग आहे. तुम्हाला स्वस्तात घर मिळवून देतो, असे सांगितले.
त्यावर फिर्यादी यांनी नंतर सांगतो, असे म्हणाले. त्यावर त्यांचा विश्वास बसावा, म्हणून त्यांनी तुम्हाला घर मिळणारच तसा करार करुन देतो, असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी विश्वास ठेवला. तसा त्यांच्या २४ जून २०२२ रोजी मेमोरंडम ऑफ अंडरस्टैंडिंगचा (Memorandum of Understanding) करार करण्यात आला प्रभाकर कांबळे यांच्याकडे दस्त नोटरी करण्यात आली. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी ऑनलाईन पद्धतीने म्हाडात रजिस्टर केले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी ३ लाख रुपये ढाके यांना दिले. तरीही त्यांना फ्लॅट काही मिळाला नाही. त्यांनी दिलेले चेक परत गेले. तेव्हा त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना एक लाख रुपये परत केले. त्यानंतरही उरलेले २ लाख रुपये परत न केल्याने शेवटी त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक पलांडे (API Palande) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

29 September Rashifal | वृषभ, धनु आणि कुंभसह तीन राशींचे उत्पन्न वाढणार, वाचा दैनिक भविष्य

Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat | मंत्री विखेंचा थोरातांना खोचक सल्ला; म्हणाले – ‘पाहुणे म्हणून येता, पाहुण्यासारखे राहा, भाडेकरू…’

ACB Trap Case News | महिला शेतकऱ्याकडून लाच घेताना तलाठी व कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Minister Deepak Kesarkar | मंत्री केसरकारांचे धक्कादायक विधान, ”कार्यभार स्विकारल्यानंतर २५ कोटींची ऑफर, पण…”

Jitendra Awhad On Mulund Incident | मुलुंडमधील घटनेवर जितेंद्र आव्हाडांची वेगळीच प्रतिक्रिया, मराठी लोकांना दाखवला आरसा