Pune Crime News | भांडणातील मुलांची नावे सांगावित म्हणून मुलाला नग्न करुन काढले फोटो; सराईत गुंडांसह टोळक्यावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भांडणातील मुलांची नावे सांगावित म्हणून गुंडांच्या (Criminal) टोळक्याने एका अल्पवयीन मुलाला तळजाई पठारावर (Taljai Tekdi Pune) पळवून नेले. तेथे त्यांचे कपडे काढून त्याला नग्न करुन फोटो (Nude Photos) काढल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी धनकवडीत राहणार्‍या मुलाच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिजित पाटील ऊर्फ मायाभाई (रा. जनता वसाहत), प्रमोद कळंबे या सराईत गुंडासह त्याच्या टोळक्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना लक्ष्मीनगर येथील शाहु कॉलेज येथून सूर्या चौक आंबेगाव व तळजाई पार येथे गुरुवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शाहु कॉलेज येथे असताना साई,
सुमित यांनी त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर दोघांमध्ये बसवून साई सिद्धी चौकापासून सूर्या चौकात नेले.
तेथून तळजाई पार येथे मोकळ्या मैदानात आणले.
तेथे अभिजित पाटील याने या मुलाला काल तळजाई येथे झालेल्या भांडणातील मुलांना घेऊन ये, असे म्हणून धारदार हत्यार गळ्याला लावून खल्लास करुन टाकण्याची धमकी दिली.
या मुलाचे सर्व कपडे काढून नग्न करुन त्याचे फोटो काढले. त्याने ही बाब वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
अभिजित पाटील व प्रमोद कळंबे हे सराईत गुंड असून पोलीस उपनिरीक्षक कामे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Photographs of the child were taken naked to reveal the names of the children in the fight; A case has been registered against a gang of inn goons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | देशात सरकार बदलण्याचा मूड, आगामी बदलांसाठी ‘ही’ गोष्ट अनुकूल; शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra Prison Department | आता विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले

PMPML | पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत प्रवास, 8 मार्च पासून बससेवा पुर्ववत