Pune Crime News | पोलीस नियंत्रण कक्षाला फोन अन् चोरटे जेरबंद; हडपसरमध्ये घरफोडी करणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वेळ मध्यरात्री दीडची….. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन येतो… काही मिनिटात मार्शल तातडीने घटनास्थळी पोहचतात… दुकानाचे शटर उचकले गेलेले असते… त्यातून चोरटे बाहेर पडत असतात… पोलिसांना पाहून बाहेर उभे असलेले ते चोरीचा माल तेथेच टाकून पळ काढतात… त्यातील एकाला शटरमधून बाहेर पडत असतानाच पकडतात. (Pune Crime News)

 

हडपसरमधील मंत्री मार्केटमध्ये (Mantri Market, Hadapsar) गुरुवारी मध्यरात्री हा थरार घडला. गस्तीवरील मार्शल पोलिसांनी गणेश गौतम कोरडे (वय २२, रा. पंधरा नंबर चौक, हडपसर) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार साहिल कचरावत (रा. सातवनगर, हडपसर – Hadapsar News) व आणखी एक पळून गेला आहे.

 

याप्रकरणी सतिश शिवाजी भिसे Satish Shivaji Bhise (वय ४८, रा. हडपसर गाव) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यांचे मंत्री मार्केटमधील अविष्कार बिल्डिंगमध्ये मेन मुमेट कलेक्शन हे कापडाचे दुकान आहे. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील वेगवेगळ्या रंगाचे, कंपनीचे १ लाख २० हजार रुपयांचे २०० शर्ट त्यांनी चोरले. त्याचे गठ्ठे ते बाहेर घेऊन येत होते. तोपर्यंत चोरी होत असल्याचे कोणाच्यातरी लक्षात आले. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. त्याबरोबर गस्तीवरील पोलीस तातडीने तेथे पोहचले. त्यातून दुकानातून बाहेर पडणार्‍या चोरट्याला पकडले. नागरिकाने वेळीच पोलिसांनी कळविल्याने चोरटा रंगेहाथ सापडला.

 

Web Title :- Pune Crime News | Police Control Room Phones and Thieves Jailed;
House burglar arrested in Hadapsar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा