Pune Crime News | पुणे: लोणीकंद, हडपसर, स्वारगेट आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडी ! दागिने, रोख रक्कम, टीव्ही लंपास

Shivaji Nagar Pune Crime News | Moved to another place due to house leak; house burglary by a thief, incident in Revenue Colony Shivaji Nagar Pune

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये घरफोडीचे सत्र सुरुच आहे. शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही तसेच इतर साहित्य चोरुन नेले आहे. चोरट्यांनी पावणे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. या घटना लोणीकंद (Lonikand), हडपसर (Hadapsar), स्वारगेट (Swargate), सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरात घडल्या आहेत. (House Burglary)

स्वारगेट परिसरातील सॅलीसबरी पार्क येथील मानसी इंटरप्रायजेस या दुकानातून दोन अज्ञात चोरट्यांनी 43 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून मुद्देमाल चोरुन नेला आहे. याप्रकरणी सत्यदेव रामधणी तिवारी (वय-35 रा. पुण्यधाम आश्रम रोड, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हा प्रकार 28 जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबिकर करीत आहेत.(Pune Crime News)

घरफोडीची दुसरी घटना वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. चोरट्यांनी बंद सदनिकेच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरुमधील कपाटात कापडी पिशवीत ठेवलेले 62 हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार रविवारी (दि.10) दुपारी सव्वा एकच्या सुमारास उघडकीस आला. हा प्रकार गोसावी वस्ती येथील हिराई रेसिडेन्सी येथे घडला आहे. याबाबत श्वेता साईनाथ शिंदे (वय-28) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घरफोडीची तिसरी घटना केसनंद येथील जोगेश्वरी पार्क येथे घडली आहे.
अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला.
घरातील सीसीटीव्ही फुटेजचा डिसीआर, दोन एलसीडी, 32 इंची टिव्ही, म्युजीक सिस्टीम, गॅस शेगडी असा एकूण
38 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार रविवारी (दि.10) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.
याबाबत सुजाता संजय पंडीत (वय-50 रा. विमाननगर, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घरफोडीची चौथी घटना हडपसर परिसरात घडली आहे.
चोरट्यांनी पत्र्याच्या शेडच्या गोडाऊनचे पत्रे उचकटून गोडाऊनमध्ये प्रवेश केला. गोडाऊनमध्ये ठेवलेले बोरोप्लस क्रिम, फेअरनेस क्रिम व झंडु बाम असा एकूण एक लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी (दि.9) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत विकासकुमार विजयकुमार गुप्ता (वय-43 रा. घोरपडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati-Nagpur National Highway | धावत्या ट्रॅव्हल बसवर सिनेस्टाईल गोळीबार, ४ प्रवाशी जखमी, महाराष्ट्रातील महामार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Uddhav Thackeray On Eknath Shinde | पक्ष फोडणे ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती…, वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल!

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | तुम्ही आपआपले उमेदवार जाहीर करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? वंचितने व्यक्त केली जाहीर नाराजी

छोटा शेख सल्ला दर्गा: ‘रील’ व्हायरल करुन अफवा पसरवणाऱ्या दोघांवर वानवडी पोलिसांकडून FIR

Pune Kothrud Crime | किरकोळ कारणावरून तरुणावर सत्तुरने वार, कोथरुड परिसरातील घटना

Computer Engineer Arrested In Pune | पुणे : दुकानातून लॅपटॉप चोरणाऱ्या कॉम्प्युटर इंजिनियरला सायबर पोलिसांकडून अटक

Total
0
Shares
Related Posts
Pune PMC News | Katraj Kondhwa road work to be completed by March 2026 by acquiring land as per special law; Decision taken in meeting with District Collector - Information from Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune PMC News | विशेष कायद्यानुसार भूसंपादन करून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करणार; जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत निर्णय – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती