Pune Crime News | 20 कोटीचे खंडणी प्रकरण! कुख्यात गजा मारणेला विशेष न्यायलयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | व्यावसायिकाकडे 20 कोटी रुपये खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे (Gajanan alias Gaja Marne) याला अटक (Arrest) करण्यात आली होती. याप्रकरणी गजा मारणे (Pune Crime News) याला विशेष न्यायालयाचे (Special Court) न्यायाधीश एस. आर. नावंदर (Judge S. R. Navandar) यांनी जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे.

 

व्यावसायिकाकडे 20 कोटी रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गजा मारणे याच्यासह 18 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell) गजाला अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात गजा मारणे याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. याबाबतचा खुलासा पोलिसांनी आरोपीविरुद्ध दाखल केलेल्या दोषारोपपत्रात केला होता. (Pune Crime News)

 

मारणे याच्याविरुद्ध ठोस पुरावे नाहीत. खंडणी प्रकरणाशी प्रत्यक्ष त्याचा संबंध नाही. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती गजा मारणे याचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijay Singh Thombre) युक्तिवादात केली. हा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने गजा मारणे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. विशेष न्यायालयाने मारणे याची 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली आहे.

 

गजानन उर्फ गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड असून त्याची कोथरुड परिसरात दहशत आहे.
त्याच्याविरुद्ध खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
खून प्रकरणात न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली होती.
त्यावेळी त्याच्या साथीदारांनी नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून (Taloja Jail) मोटारीतून रॅली काढली होती.
तळोजा कारागृह ते कोथरुड पर्यंत काढलेल्या रॅलीत 300 ते 400 मोटारी होत्या.
द्रुतगती महामार्गावर मारणे टोळीतील गुन्हेगारांनी दहशत माजवली होती.
याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गजा आणि
त्याच्या साथीदरांविरुद्ध खालापूर (Khalapur Police Station), शिरगाव (Shirgaon Police Station)
आणि कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हे दाखल केले होते.

 

Web Title :- Pune Crime News | Pune kothrud gangster gaja marne granted bail by special court

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shambhuraj Desai | ‘बाळासाहेब ठाकरेंना कुटुंबापुरते मर्यादित ठेऊ नका’, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका

Chandrashekhar Bawankule | अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

Uday Samant | चालकाचे नियंत्रण सुटलं अन्…, उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या बोटीला अपघात