Pune Crime News | सराईत गुन्हेगाराकडून 2 देशी बनावटीचे कट्टे जप्त, खंडणी विरोधी पथक-2 ची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बेकायदेशीर गावठी बनावटीचे कट्टे (pistol seized) बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनच्या Anti Extortion Cell Pune (AEC Pune) पोलिसांनी अटक केली आहे. अटक (Pune Crime News) करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन कट्टे आणि चार जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत.

साहस विश्वास पोळ Sahas Vishwas Pol (वय-24 रा. वडकीगाव, मुळ रा. वीर परींचे ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई उरुळी देवाची परिसरात सापळा रचून केली.

पुणे शहरात विना परवाना पिस्टल बाळगणारे, शस्त्र पुरवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले होते. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून माहिती काढली जात असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे (Police Surendra Jagdale) व सचिन अहिवळे (Police Sachin Ahiwale) यांना माहिती मिळाली की, उरुळी देवाची परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) साहस पोळ याच्याकडे देशी बनावटीचे कट्टे आहेत.

पोलिसांनी उरुळी देवाची परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 42 हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokle), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या
मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (PI Pratap Mankar),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane), पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव
(PSI Mohandas Jadhav) व पोलीस अंमलदार सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, प्रदिप शितोळे (Police Pradeep Shitole),
विजय गुरव (Police Vijay Gurav), संग्राम शिनगारे (Police Sangram Shingare), ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे,
राहुल उत्तरकर (Police Rahul Uttarkar), सैदोबा भोजराव, चेतन आपटे, अमोल पिलाणे, शंकर संपते
(Police Shankar Sampate), किशोर बर्गे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने करण्याचा प्रयत्न करणार्‍या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Ajit Pawar | जयंत पाटलांनी अमित शहांची भेट घेतली? अजित पवारांचा मोठा खुलासा; म्हणाले…

Chandrashekhar Bawankule | ‘देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच…’ बानकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Political News | ‘तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?’, उद्धव ठाकरेंच्या टिकेला भाजपचे ‘धनंजय माने स्टाईल’ प्रत्युत्तर