Pune Crime News | ‘मोक्का’च्या गुन्हयात फरारी असलेला सराईत गुन्हेगार अन् टोळीचा म्होरक्या जंगळया सातपुतेला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ‘मोक्का’च्या गुन्हयात MCOCA (Mokka Action) फरार असलेल्या आणि टोळीचा प्रमुख असलेल्या विशाल उर्फ जंगळया सातपुतेच्या (Vishal Alias Janglya Satpute) पुणे शहर पोलिस दलाच्या (Pune City Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट-1 ने मुसक्या आवळल्या आहेत. त्याला ऊरळी-कांचन (Uruli Kanchan) परिसरातील गगन आकांशा सोसायटी (Gagan Akansha Society) येथुन अटक केली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की दि, 24 नोव्हेंबर 2022 रोजी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका वस्तीत उमेश वाघमारे हा जोरात गाडी चालवत होता. त्यावेळी त्याला एकाने गाडी जोरात चालवु नको असे सांगितले असता त्याने मी या वस्तीचा भाई आहे तुला माहित नाही का, तुला बघून घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर वाघमारेच्या साथीदाराने संबंधिताचा रस्ता अडवून आमचा भाई जंगळया सातपुते जेलमधून सुटला आहे. त्याने तुझ्याकडून 40 हजार रूप्ये घेवून येण्यास सांगितले आहे. त्यास संबंधिताने (फिर्यादी) नकार दिला. त्यानंतर आरोपीने तुला अर्ध्या तासात दाखवितो असे म्हणुन उमेश वाघमारे, आदित्य बनसोडे, मंदार खंडागळे, कुमार लोंढे व त्याच्या साथीदारांनी टोळीचा प्रमुख विशाल उर्फ जंगळया सातपुते याच्या सांगण्यावरून कोयते, लोखंडी रॉड व लाकडी बांबुने मारहाण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. (Pune Crime News)

 

याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात (Khadak Police Station) खुनाच्या प्रयत्नाचा आणि खंडणीची गुन्हा दाखल आहे. आरोपी हे संघटीत गुन्हेगार टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दाखल गुन्हयात इतर आरोपींना अटक झाली होती मात्र टोळीचा म्होरक्या विशाल उर्फ जंगळया सातपुते हा फरार होता.

 

गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार अमोल पवार (Police Amol Pawar)
यांना दि. 5 एप्रिल 2023 रोजी जंगळया सातपुतेबाबत गोपीनय माहिती मिळाली.
तो ऊरळी कांचन परिसरात लपुन बसल्याचे माहिती समोर आल्यानंतर सदरील बातमीची खातरजमा करण्यात आली.
त्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) , सह आयुक्त संदिप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik),
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद (Sr PI Shabbir Sayyad),
पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलिस अंमलदार अमोल पवार,
इम्रान शेख, आण्णा माने, निलेश साबळे, शुभम देसाई, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे आणि
तुषार माळवदकर यांच्या पथकाने विशाल उर्फ जंगळयाला गगन आकांशा सोसायटी जवळून ताब्यात घेवुन अटक केली.

 

Web Title :-Pune Crime News | Pune Police Crime Branch Arrest Gang leader Vishal Alias Jangalya Satpute, who is absconding in MCOCA Mokka Action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करु नयेत, त्याची सुरुवात चंद्रकांत पाटलांनी स्वत: पासून करावी’, अजित पवारांचा टोला (व्हिडिओ)

Pune Crime News | आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या बुकीला गुन्हे शाखेकडून अटक; पुण्यातील इतर बुकी पोलिसांच्या ‘रडार’वर

Pune Political News | खा. अमोल कोल्हे भाजपात आले तर आढळरावांचं काय? चंद्रकांत पाटलांचं सुचक विधान