Pune Crime News | गणेशोत्सवात मोबाईल चोरणारी परराज्यातील टोळी गजाआड, हडपसर पोलिसांकडून झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेशातील चोरट्यांकडून महागडे मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात गणेशोत्सवात (Pune Ganeshotsav) गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. त्यामुळे पुण्यातील मध्यवर्ती भागात आणि उपनगरांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेऊन गणेश भक्तांचे मोबाईल चोरणाऱ्या (Mobile Thief) उत्तरप्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल येथील चोरट्यांना हडपसर पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 20 महागडे मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. (Pune Crime News)

कौशल मुन्ना रावत (वय-21, रा. लखनौ, उत्तर प्रदेश), संतोषसिंग श्रवण सिंह (वय-22, रा. झारखंड), जोगेश्वर कुमार रतन महातो (वय -30, रा. झारखंड), सूरज रामलाल महातो (वय-30, रा. झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. चोरट्यांनी शहराच्या मध्यभागातून मोबाईल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गणेशोत्सवात मोबाईल चोरी होण्याचे प्रकार घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलिसांनी विशेष पथक तयार केले असून देखावे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे महागडे मोबाईल चोरणारे हडपसर मधील गांधी चौकात थांबले असल्याची माहिती पोलीस अंमलदार अजित मदने, प्रशांत टोणपे यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijayakumar Shinde), पोलीस उपनिरिक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde) यांच्या पथकाने सापळा रचून चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेऊन 3 लाख 80 हजार रुपयांचे 20 मोबाईल जप्त केले. (Pune Crime News)

आरोपी लखनौ रेल्वे स्थानकावर (Lucknow Railway Station) एकत्रीत भेटले. त्यानंतर ते पुण्यात आले. आरोपींनी फरासखाना, स्वारगेट, बंडगार्डन, हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीतून मोबाईल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 विक्रम देशमुख (DCP Vikram Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Senior PI Ravindra Shelke), सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार अजित मदने, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’