
Pune Crime News | हडपसर : माझ्याबद्दल चाड्या करतो, तुझा कायमचा विषय संपवून टाकतो; तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | माझ्याबद्दल चाड्या करतो, तुझ्यामुळे माझी नोकरी गेली. आता तुझा कायमचा विषय संपवून टाकतो, असे म्हणून एकाने कोयत्याने तरुणाच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)
रणजित रिठे असे या तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याबाबत विनय शरद खवळे (वय २४, रा. सिंहगड कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४९७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पंकज अंकुश धोत्रे Pankaj Ankush Dhotre (वय २८, रा. सिंहगड कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरासमोर दुचाकीवर बसले असताना त्यांच्या घरासमोर
राहणारा पंकज याने अचानक फिर्यादीस शिवीगाळ करुन त्याच्या तोंडावर ठोसा मारुन खाली पाडले.
ते पाहून फिर्यादीचा मामेभाऊ रणजित रिठे हा मध्ये आला. त्याने त्यालाही ठोसा मारला.
घरातून लोखंडी शस्त्र घेऊन येथून रणजित याला तू माझ्या बद्दल चाड्या करतो.
तुझ्यामुळे माझी नोकरी गेली व माझ्याकडे सारखा रागाने बघतो, तुला मी जीवंत सोडणार नाही.
तुझा कायमचा विषय संपवून टाकतो, असे बोलून त्याने रणजित याच्या तोंडावर, डावे बाजूला, डोक्यावर वार करुन
गंभीर जखमी केले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक खळदे (PSI Khalde) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या वॉर्ड नं. 16 मधून आरोपीचे पलायन, प्रचंड खळबळ
03 October Rashifal : मिथुन, वृश्चिक आणि मकर राशीच्या जातकांना होणार धनलाभ, वाचा दैनिक भविष्य