Pune Crime News | पुण्यात शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केले पोस्ट बलात्काराचे व्हिडीओ, विद्यार्थी मेळाव्यात जुनी ओळख झाली ‘ताजी’ अन् लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – महिलेवर बलात्कार (Rape) करुन त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग (Video recording) शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर (School WhatsApp Group) पाठवल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime News) उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे शहरातील (Pune City) सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला (Accused) अटक (arrest) केली आहे. आरोपीवर बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (Rape and Information Technology Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. pune crime news recordings of rape sent on school whatsapp group rape case ragistered in sahakarnagar police station

उमेश असुलाल डांगी Umesh Asulal Dangi (वय-40 रा. फ्लॅट नं. बी/504, शिल्पतारा सोसायटी, स.नं.15 आंबेगाव पठार, पुणे) असे अटक (arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 40 वर्षीय पीडित महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद दिली आहे. पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या 24 तासात मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांनी पुणे शहरातील (Pune City) एका नामांकित शाळेत (school) एकत्र शिक्षण (Education) घेतले आहे. 2019 मध्ये शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात त्यांची पुन्हा ओळख झाली. यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (WhatsApp group by alumni) तयार केला होता. यातून आरोपी उमेश डांगी (Accused Umesh Dangi) याने पीडित महिलेसोबत ओळख वाढवली. ओळख वाढल्यानंतर पीडित महिला रहात असलेल्या घरी जाऊन त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

आरोपीने शारीरिक संबंधाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग (Video recording) करुन ते शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर (school WhatsApp group) पाठवले.
त्यामुळे पीडित महिलेची मित्र परिवारात मोठी बदनामी झाली.
पीडित महिलेने शुक्रवारी (दि.25) सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) धाव घेत उमेश डांगी (Umesh Dangi) याच्या विरोधात फिर्याद दिली.
पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar Police Station) आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai) करित आहेत.

Web Titel :- pune crime news recordings of rape sent on school whatsapp group rape case ragistered in sahakarnagar police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर