Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्‍याबरोबर व्यवहार करणार्‍या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | मुळशी तालुक्यातील जमीन विक्री (Land Sale) करण्याच्या करारनामा करुन त्यावरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटी रुपयांचे सुरक्षा ठेव घेतली. मात्र, १२ वर्षानंतरही बँकेचा बोजा न उतरविता त्या जमिनीचा परस्पर दुसर्‍याशी व्यवहार करुन ३ कोटींची फसवणूक (Cheating Case) करणार्‍या नारायण अंबिका इंफ्रा प्रा. लि. कंपनीच्या (Narayan Ambika Infra Pvt. Ltd. Company) संचालकांवर गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत कैलास बाबुलाल वाणी (वय ५५, रा. प्रभात रोड) यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०३/२३) दिली आहे. त्यानुसार नारायण अंबिका इंफ्रा प्रा. लि. चे संचालक कैलास गर्ग (Director Kailas Garg) आणि पवन कैलासचंद गर्ग (Pawan Kailaschand Garg) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ जून २०११ पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कैवल्य इंटरप्रायजेस (Kaivalya Enterprises) ही
बांधकाम व्यवसाय करणारी कंपनी आहे. नारायण अंबिका इंफ्रा कंपनीचे संचालक कैलास गर्ग यांनी मुळशी
तालुक्यातील कासारआंबोली येथील मिळकत विक्रीला काढल्याचे समजले. त्यांनी संपर्क केल्यावर त्यांनी त्या
जागेवर बँकेचा बोजा आहे. तो उतरविण्यासाठी ३ कोटी रुपये बिनव्याजी सुरक्षा ठेव देण्याचे ठरले.
त्यानुसार २२ जून २०२२ रोजी विकसन करारनामा करण्यात आला. जागेच्या सुरक्षेसाठी फिर्यादी यांच्या कंपनीने ५० लाख रुपये खर्च करुन तारेचे कंपाऊड घातले. मात्र, फिर्यादी यांच्याकडून पैसे घेतल्यानंतरही त्यांनी जमिनीवरील बोजा उतरविला नाही. तसेच त्या जागेवर इतरही दुसर्‍या बँकेकडून कर्ज घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी करार रद्द करण्याचे ठरविले. गर्ग याने दिलेले धनादेश खात्यात पैसे शिल्लक नसल्याने परत आले.

कर्ज पुरवठा करणार्‍या बँकेचे अधिकार्‍यांना हाताशी धरुन गर्ग याने दुसर्‍या बांधकाम व्यावसायिकाशी संगनमत
करुन छुप्यात रितीने व्यवहार करुन ही मालमत्ता परस्पर दुसर्‍या बांधकाम व्यावसायिकाच्या नावावर करुन
देण्याचे समजले. त्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Shivajinagar Police Station – 3 Crore fraud to clear bank lien on purchased land; A case has been filed against the director of Narayan Ambika Infra for dealing with each other

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune water Supply | शुक्रवारी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी गुरुवारी रात्रीच जलकेंद्रातील टाक्या भरणार

Pune News | FSI वरुन भाजपने पेठांमध्ये राहाणाऱ्यांची फसवणूक केली, भाजपने पुणेकरांवर सूड उगवला; काँग्रेसचा घणाघात