Pune Crime News | डॉक्टरचे अपहरण करुन 25 लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने लुटणारी टोळी लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एका पशुवैद्यकीय डॉक्टरांचे (Veterinary Doctor) अपहरण (Kidnapping) करुन 25 लाख रुपये रोख व 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) लुटणाऱ्या 6 जणांच्या टोळीला लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station) तपास पथकाने अटक केली आहे. (Pune Crime News) याबाबत डॉक्टर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आयपीसी 364 (अ), 386, 397, 506(2) ,323, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

माऊली ऊर्फ ज्ञानदेव महादेव क्षिरसागर (मुळ रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर सध्या रा. मुपो शेंद्री, ता. बार्शी, जि. सोलापूर), राहुल दत्तु निकम (वय 27, रा. मुपो. शहा, ता. इंदापुर, जि. पुणे), नितीन बाळु जाधव (वय-25 रा. मुपो शहा, ता. इंदापुर), सुहास साधु मारकड (वय-28 रा. मुपो. पडस्थळ, ता. इंदापुर), विद्या नितीन खळदकर (वय-35 रा. ढगे मळा, कुर्डुवाडी रोड, ता. बार्शी, जि. सोलापुर), संतोष धोंडीबा गोंजारी ऊर्फ राणी पाटील (वय-34 मुळ रा. जगलबेट, ता. जोथाडा, जि. कारवार, कर्नाटक, सध्या रा. लोणी देवकर ता. इंदापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News)

फिर्यादी डॉक्टर आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत असून त्यांची पहिल्या पत्नीशी घटस्फोटाची (Divorce) केस न्यायालयात चालू आहे. न्यायालयाने त्यांना पहिल्या पत्नीला 20 लाखांची पोटगी (Alimony) देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम देण्यासाठी डॉक्टरांनी जुळवाजुळव करून रक्कम घरी आणून ठेवली होती. दरम्यान डॉक्टरांची दुसरी पत्नी तिच्या माहेरी बार्शी येथे गेली होती. घरात बोलत असताना तिच्याकडुन पतीने घरात आणून ठेवलेल्या पैशांची माहिती तिच्या भावजयला समजली. भावजयने तिचा इंदापूर येथील मित्र राहुल निकम आणि त्याचे साथीदार यांना सोबतीला घेऊन डॉक्टरांना लुटण्याचा कट रचला.

बुधवारी (दि.9 ऑगस्ट) रोजी गुन्ह्यातील आरोपी राणी पाटील हिने मोबाईल वरून फिर्यादी यांना कॉल करून कुत्रे आजारी असल्याचे सांगून वडकी येथील एका निर्जनस्थळी बोलून घेतले. त्या ठिकाणावरून काही जणांनी त्यांचे नंबर नसलेल्या एका चारचाकीतून अपहरण केले. फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देऊन तुमच्या पत्नीने व मेव्हण्याने तुम्हाला मारण्याची सुपारी दिली असल्याचे सांगितले. तसेच त्यांचा मोबाईल व घराच्या चाव्या जबरदस्तीने घेऊन त्यांच्या घरातील 25 लाख रुपये रोख व 2 लाख 10 हजार रुपयांचे दागिने घेऊन गेले.

या गुन्ह्यामध्ये आरोपींनी कोणताही पुरावा पाठीमागे राहणार नाही याची काळजी घेऊन नियोजनबद्ध कट रचला.
मात्र, लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपूर्ण व तांत्रिक अभ्यास करून आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन कार, दोन दुचाकी, तक्रारदार यांचा मोबाईल, तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले सहा मोबाईल, सोन्याचे दागिने व लुबाडलेल्या रकमेपैकी 12 लाख रुपये रोख असा एकूण 22 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (PSI Amit Gore) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
परिमंडळ 5 पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख-केदार (ACP Ashwini Rakh-Kedar),
वरीष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण (Senior PI Dattatraya Chavan),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (PI Subhash Kale)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस अंमलदार सातपुते, गायकवाड,
बोरावके, सायकर, देविकर, नागलोत, जाधव, कुदळे, शिरगीरे, विर, पाटील, सोनवणे,
महिला पोलीस शिपाई फणसे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना

Mera Bill Mera Adhikar द्वारे कसे जिंकू शकता १ कोटी रुपयांपर्यंत बक्षीस, जाणून घ्या पूर्ण पद्धत

Janhvi Kapoor | जान्हवीच्या क्रॉप टॉपने वेधले उपस्थितींचे लक्ष; फोटो व्हायरल