Pune Crime News | रिक्षाचालकाला कोयत्याचा धाक दाखवून पसरवली दहशत, तडीपार गुन्हेगार गजाआड; भवानी पेठेतील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तडीपार गुन्हेगाराने रिक्षाचालकाला कोयत्याचा (Koyta) धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी तडीपार गुन्हेगारावर (Tadipar Criminals In Pune) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.13) मध्यरात्री दीडच्या सुमारास चमनशहा दर्गाच्या मागील गल्लीतील सार्वजनिक ठिकाणी घडला आहे. (Pune Crime News )

याबाबत अभिजीत बापु हणवते (वय-28 रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नाझीर सलीम शेख Nazir Salim Shaikh (रा. हनुमान मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 506 (2), आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल अॅमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Records) असून त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. (Pune Crime News )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी रात्री दीडच्या सुमारास चमनशहा दर्गाच्या मागील गल्लीत रिक्षा घेऊन आले. त्यावेळी आरोपी नाझीर शेख हा तडीपार असताना त्याठिकाणी आला. त्याने फिर्यादी यांची कॉलर पकडून त्यांना धमकी दिली. तसेच कमरेच्या डाव्या बाजूस पॅन्ट च्या आतमध्ये लपवून ठेवलेला कोयता बाहेर काढून ‘मेरे खिलाफ पुलीस के पास गया तो तुझे काट डालुंगा’ अशी धमकी दिली. यानंतर हातातील कोयता हेवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

रुणाच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न, रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांवर गुन्हा;
भवानी पेठेतील घटना

अल्पवयीन मुलीला धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, तरुणावर FIR; विश्रांतवाडी परिसरातील घटना