Pune Crime News | बाथरुमचे दार वाजविल्याने शिक्षिकेने मुलाला स्टिलच्या रॉडने केली मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गमतीत बाथरुममध्ये कोंडल्याने मुलाने सुटकेसाठी बाथरुमचा दरवाजा वाजविला. या प्रकाराने चिडलेल्या क्लास शिक्षिकाने (Class Teacher) १२ वर्षाच्या मुलाला धमकावून स्टिलच्या रॉडने मारहाण (Beating) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत चिंचवड गाव येथील एका वडिलांनी कोथरुड पोलिसांकडे (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५२/२३) दिली आहे. त्यानुसार उजवी भुसारी कॉलनी येथील एका क्लास शिक्षिकेवर पोलिसांनी बाल न्याय कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजवी भुसारी कॉलनीत एक क्लास आहे. फिर्यादी यांचा १२ वर्षाचा मुलगा या क्लासला येतो. २ जुलै रोजी़ दुपारी अडीच वाजता हा मुलगा बाथरुममध्ये गेला होता. त्यावेळी त्यांच्या मित्राने बाथरुमचा दरवाजा बाहेरुन लावला. त्यामुळे तो आत कोंडला गेल्याने त्याने दरवाजा जोरजोरात वाजविला. त्यावेळी क्लास घेणार्‍या शिक्षिका यांनी ‘‘तुला संस्कार नाहीत का शिकविले. तुला अक्कल नाही का, तुला नागडा करुन झोपडपट्टीत फिरवेन, तुला पोलिसात देईऩ’’ अशी धमकी देऊन त्याच्या हातावर स्टिलच्या रॉडने जोरजोरात फटके मारुन दुखापत केली. पोलिसांनी ज्युवेनाईल जस्टिस अ‍ॅक्टनुसार (Juvenile Justice Act) गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पांढरे तपास करीत आहेत.

Web Title :   Pune Crime News | The teacher beat the boy with a steel rod after he rang the bathroom door

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तारण ठेवलेले दागिने मोडून जबरदस्तीने कार नेली; 18 लाखांची मागणी करणाऱ्या सावकराला अटक

Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर हॉटेलमध्ये घुसून 12 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बहाण्याने केली लाखो रुपयांची फसवणूक

Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

Devendra Fadnavis | “ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील” – देवेंद्र फडणवीसांची माहिती

LPG Gas Cylinder Price | व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update | अनेक भागात पावसाची संततधार; कोकणात ‘ऑरेंज’ तर विदर्भासह मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’