Pune Crime News | पालिकेची कारवाई टाळण्यासाठी मागितली 8 लाखांची खंडणी, महिलेसह दोघांना कोथरुड पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वडिलोपार्जित जमीनीवर असलेले पत्र्याचे शेड अनधिकृत असल्याचे सांगून शेडवर महापालिकेची (Pune Municipal Corporation (PMC) कारवाई नको असेल तर आठ लाख रुपये द्या म्हणत खंडणी (Extortion) मागितली. याप्रकरणी (Pune Crime News) एका महिलेसह दोघांना कोथरुड पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या महिलेने तक्रारदार यांना स्वत:ची ओळख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI (ए) पक्षाच्या महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगितले.
पूजा काळु तायड Pooja Kalu Taid (वय-45 रा. वृंदावन कॉलनी, कोथरुड) आणि निलेश शंकर वाघमारे Nilesh Shankar Waghmare (वय-35 रा. सागर कॉलनी, कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत नितीन शिंदे Nitin Shinde (वय-32 रा. भुजबळ टाऊनशिप, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या तीन चुलत्यांची शिंदे फार्म कोथरुड (Shinde Farm Kothrud) येथे वडीलोपार्जित चार एकर चार गुंठे जमीन आहे. आरोपी पुजा आणि निलेश यांनी संगनमत करुन फिर्यादी नितीन शिंदे यांच्या वडीलांच्या नावावर असलेल्या मालकीच्या 10 हजार चौरस फुट जागेवर असलेले पत्राशेड अनधिकृत असल्याबाबत पालिकेकडे अर्ज केला होता.
पालिकेकडे केलेला अर्ज मागे घेण्यासाठी व शेडवर कारवाई न करण्यासाठी आरोपी फिर्यादी यांना भेटले.
तसेच पुजा तायड यांनी स्वत:ची ओळख आरपीआय (ए) पक्षाची कार्यकर्ती तसेच पुणे शहर व जिल्हा महिला आघाडीची अध्यक्ष असल्याचे सांगितले.
पालिकेची शेडवर कारवाई नको असेल तर चौघांनी आठ लाख रुपये द्या असे म्हणत खंडणीची मागणी केली.
तसेच दोन दिवसांत पैसे दिले नाहीतर येत्या चार-पाच दिवसात कारवाई करण्यास भाग पाडेन अशी धमकी दिली.
तडजोडी अंती पाच लाख रुपयांची मागणी केल्याने गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | two people arrested for extortion by kothrud police pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…