Pune Crime News : शारीरिक संबंधाच्या बहाण्याने मिळवला व्हॉट्सअ‍ॅप नंबर, नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करुन केले ब्लॅकमेल, उकळलले पैसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस बदलत जाणारे गुन्हेगारीचे (Crime) स्वरूप आता नवनवीन टेक्नोलॉजीमुळे (Technology) अधिकच गंभीर होत चालले आहे. या टेक्नोलॉजीच्या माध्यमातून पुण्यात (Pune) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाला व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) अश्लील व्हिडीओ कॉल रेकॉर्ड (Whatsapp Video Call) करुन तरुणाला ब्लॅकमेल (Blackmail) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तरुणाने पुणे सायबर विभागाकडे (Pune Cyber Department) तक्रार दाखल केली आहे.

पुण्यातील एका तरुणाचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करुन त्याच्याकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने खंडणी (Ransom) उकळण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात फेसबुक (Facebook) अकाउंटधारकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा (Kondhwa) परिसरात राहणाऱ्या एका 29 वर्षीय तरुणाने फेसबुकवरील नताशा नावाच्या तरुणीविरोधात तक्रार दिली आहे.

काय आहे प्रकरण ?
कोंढवा येथील तक्रारदार तरुणाला फेसबुकवरील मेसेंजरवरुन (Facebook Messenger) नताशा नावाच्या तरुणीने मेसेंज पाठवला होता. तीने शारीरिक संबंधाच्या बहाण्याने त्याचा व्हॉट्सअ‍ॅप Whatsapp नंबर मागून घेतला. त्यानंतर त्याला व्हिडीओ कॉल (Video call) करुन नग्न होण्याची विनंती केली. तो नग्न होताच त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केले. यानंतर त्याला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी कोली.

गुगल पे द्वारे दिली खंडणी
तरुणीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे खंडणीची मागणी केली. तसेच खंडणीचे Ransom पैसे ऑनलाईन पद्धतीने देण्यास सांगितले. मात्र, तरुणाच्या बँक खात्यामध्ये केवळ 957 रुपये होते. त्याने गुगल पे द्वारे (Google Pay) 957 रुपयांची खंडणी दिली.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’

फायद्याची गोष्ट ! केवळ 10 हजाराची गुंतवणूक करून मिळवा 16 लाखांचा ‘लाभ’, जाणून घ्या पोस्टाच्या ‘या’ भन्नाट स्कीमबद्दल

.रेल्वे भरती 2021 : 10 वी पाससाठी विना परीक्षा 3322 जागांसाठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार निव

Monsoon 2021 : मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन, कोकणासह सोलापूरपर्यंत मारली मजल

Pune : सोमवारपासून शहरातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहाणार; संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मात्र कडक संचारबंदी