Pune Crime News : लग्नापुर्वीच्या संबंधास ‘अडसर’ ! 27 वर्षीय पतीला दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन गळा दाबून संपवलं, 19 वर्षीय पत्नी अन् तिच्या प्रियकराच कृत्य; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधातून पत्नीने प्रियकराच्या (boyfriend ) मदतीने पतीला दुधातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे त्याला गाढ झोप लागली आणि त्यानंतर तिने त्याचा गळा दाबून खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पत्नी आणि तिचा प्रियकर boyfriend याला अटक केली आहे.

अश्विनी मनोहर हांडे (वय १९, रा. उरळी कांचन), गौरव संतोष सुतार (वय १९, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मनोहर हांडे (वय २७, रा. उरुळी कांचन) असे खुन झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकेतन बाबासाहेब निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. उरुळी कांचन येथे मनोहर हांडे यांचा २४ मे रोजी मृत्यु झाला होता. लोणी काळभोर पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद करुन त्याचा तपास सुरु केला होता. तपासादरम्यान अश्विनी व गौरव यांचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध असून त्यातूनच घातपात झाला असल्याचा पोलिसांना संशय आला. मनोहर हांडे याचे अश्विनीशी जानेवारीमध्ये लग्न झाले होते. पोलिसांनी गौरव याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर त्याने अश्विनीच्या मदतीने खुन केल्याची कबुली दिली. गौरव व अश्विनी यांचे प्रेमसंबंध होते. त्यात मनोहर याचा अडथळा ठरत येत होता. गौरव याने अश्विनी हिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. तिने मनोहर याला दुधातून या गोळ्या दिल्या. त्याला गाढ झोप लागल्याने त्यांनी गळा दाबून त्याचा खुन केला. त्यानंतर गोळ्यांचे पाकिट फेकून दिले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक सुभाष काळे अधिक तपास करीत आहेत.

सदरील गुन्हयामध्ये कोणताही पुरावा उपलब्ध नसताना लोणीकाळभोर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजु महानोर, उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, कर्मचारी नितीन गायकवाड, शंकर नेवसे, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, प्रमोद गायकवाड, रोहिदास पारखे, दिगंबर साळुंके, निखील पवार, राजेश दराडे, बाजीराव वीर आणि शैलेश कुदळे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुभाष काळे करीत आहेत.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’